शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी अडवा पाणी जिरवा’

By admin | Updated: May 16, 2016 03:12 IST

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे आपण लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलेलो असतो

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे आपण लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलेलो असतो, पण त्याचा वैयक्तिक पातळीवर किती विचार करतो, ही बाब खरोखरच विचार करण्याजोगी आहे. परंतु आता त्याचाच विचार न केल्यामुळे महाराष्ट्राला सामोरे जावे लागणारा दुष्काळ हे त्याचेच फलरूप असल्याचे जाणवते. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही, असा विचार करून त्या दृष्टीने प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो.पाणी वाचवण्यासाठी मी स्वत: माझ्या गावी आमच्या वाड्याभोवती औदुंबर, वड, पिंपळ इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे. कारण अशा वृक्षांमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आता तर तेथे अगदी ३० फुटांवर पाणी लागले असून, तेथे बोअरवेलची सुविधा लवकरच होणार आहे. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनावरही भर देणे आवश्यक आहे. मी स्वत: या वर्षी पाण्याने होळी खेळण्यास नकार दिला. तसेच माझ्या घरातही पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करतो. घरात पाण्याचा गळका नळसुद्धा पाण्याच्या अपव्ययास कारण ठरतो. त्यामुळे मी अशा गोष्टींची दुरुस्ती करण्यास तत्परता दाखवतो. गाडीची सफाईसुद्धा बरेचदा एसीच्या पाण्यातून केली जाते, तर कधी कोरड्या फडक्याने पुसून केली जाते. गाडी धुण्याऐवजी ती पुसून काढल्याने पाण्याची मोठी बचत होते आणि स्वच्छताही साधली जाते. पाणी वाचवण्याचा मूलमंत्र हा कोणी दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपल्या दैनंदिन कृतीतूनच शोधायचा असतो. पिण्यासाठी पाणी घेताना आवश्यक तेवढेच घ्यावे, नाहक पाणी वाया घालवू नये. त्यातूनच पाण्याचा संवर्धनात्मक विकास साधणे आपल्याला शक्य आहे आणि दुष्काळावर मात करणेही!च्शब्दांकन : तेजल गोलीपकर