अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हळद काढणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राला जॉइंट ॲग्रोस्कोची मान्यता प्राप्त होताच राज्यातील शेतकर्यांनी या यंत्राची मागणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे नांेदवणे सुरू केले आहे. यामध्ये सर्वाधिक मराठवाड्यातील शेतकर्यांचा समावेश आहे.राज्यात सांगली, सातारा, मराठवाडा व विदर्भात हळदीचे पीक घेतले जाते. २०११-१२ मध्ये राज्यात १.२३ लाख हेक्टर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड करण्यात आली होती. दरवर्षी हे क्षेत्र वाढतच आहे. याचाच विचार करू न डॉ. पंदेकृविच्या कृषी अभियांत्रिकी कृषी शक्ती व अवजारे विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक खांबलकर व डॉ. धीरज कराळे यांनी हे यंत्र विकसित केले आहे.हळद फायदेशीर पीक आहे, तथापि काढणीसाठी एकूण पीक उत्पादनाच्या खर्चात जवळपास ३० ते ४० टक्क्यापर्यंत खर्च येत असल्याने शेतकर्यांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. अशा पिकाच्या काढणीसाठी सर्व पिकाच्या पीक वाढीच्या सर्व क्रियापेक्षा जवळपास आठपट मजूर जास्त लागतो. हळद पिकाची काढणी मजुरांच्या सहाय्याने केली जाते. या पिकाची व्यावसायिक उपयोगीता बघता हळद काढणी यंत्र प्रभावी ठरले असल्यामुळे डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय जॉइंट ॲग्रोस्कोमध्ये या यंत्राला तज्ज्ञांनी मान्यता दिली आहे.ट्रॅक्टरवर चालणार्या या यंत्राचा जमिनीतून हळद काढण्याचा खर्च प्रतितास केवळ २३५ रुपये आहे. या यंत्राच्या वापरामुळे हळकंद काढण्याच्या खर्चात पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ३३.२१ टक्के बचत होते. हे यंत्र केवळ अडीच हजार रुपयांचे आहे. अकोला जिल्ह्यात सोनखास येथील पंजाबराव मुळे, बोरगाव खुर्दचे शेगोकार अशा २० ते २५ शेतकर्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक देण्यात आले आहे.
हळद काढणी यंत्र
By admin | Updated: May 22, 2014 21:56 IST