मुंबई : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशाची दुसरी विशेष यादी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. या फेरीसाठी एकूण २८ हजार ७५३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी आणि गुरुवारी प्रवेशबदल करता येईल.महाविद्यालय, शाखा आणि विषयबदल करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दुसरी विशेष फेरी घेतली आहे. शुक्रवार आणि शनिवारी या फेरीसाठी २८ हजार ७५३ अर्ज आले आहेत. त्यामुळे अद्यापही हजारो विद्यार्थी प्रशासनाने दिलेल्या प्रवेशामुळे नाखूश असल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान, तिसरी विशेष यादी दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेष फेरीच्या माध्यमातून अकरावीत प्रवेश देण्याचा विचार आहे. त्यामुळे फेरपरीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर होताच, अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. (प्रतिनिधी)
अकरावीची आज दुसरी विशेष यादी
By admin | Updated: August 23, 2016 06:06 IST