उल्हासनगर : सासरी आलेल्या मद्यपी जावयाने स्वत:सह पत्नी, सासू, मेहुणीसह १२ वर्षांच्या मुलीला कोंडून घराला आग लावली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चार जणांचे जीव वाचले. पण, जावयाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृत जावयावर गुन्हा दाखल केला आहे.दत्तात्रेय व्यायामशाळेजवळ बाबुराम काकडे कुटुंबासह राहतात. त्यांची लहान मुलगी पूनम हिचे चार वर्षांपूर्वी कोपरखैरणे येथील तुषार कांबळे याच्याशी लग्न झाले. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. तुषार दारूच्या नशेत मारहाण करतो, म्हणून पूनम माहेरी राहण्यासाठी आली होती. तुषार बऱ्याच वेळा सासरी येऊन सासूसासऱ्यासह पूनमला मारहाण करायचा. त्याला कंटाळून पूनमने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही त्याला अनेकदा समज दिली. रविवारी रात्री तुषार दारूच्या नशेत सासरी आला. तेव्हा पूनम, सासू रमाबाई, मेहुणी वैशाली, तिची १० वर्षांची मुलगी घरात होती. त्याने दरवाजाला आतून कुलूप लावून सर्वांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गाद्या, चादरी, कपाटातील सामान काढून त्याला आग लावली. घरात धूर झाल्याने जीवाच्या आकांताने सर्वांनी आरडाओरड केली. त्यांना बाहेर काढले. (प्रतिनिधी)
स्वत: लावलेल्या आगीत जावई ठार
By admin | Updated: March 20, 2017 02:10 IST