शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘सेतू’मुळे विनाअडथळा प्रवास

By admin | Updated: August 2, 2016 01:43 IST

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांचे जाळे पसरत आहे.

मंगेश पांडे,

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांचे जाळे पसरत आहे. त्यामुळे उपनगरांतील कोणत्याही भागापर्यंत विनाअडथळा, विनावाहतूककोंडी जाणे सहजशक्य बनले आहे. शहर आणि उपनगरांना जोडणारा रस्त्यांचा हा सेतू शहरवासीयांसाठी समाधानकारक ठरत आहे. औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या शहराला ‘बेस्ट सिटी’चा पुरस्कार मिळाला आहे. विविध उद्योग-व्यवसायांमुळे नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत शहराचा विस्तारही वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे सध्याचे क्षेत्रफळ १७७ चौरस किलोमीटर इतके आहे, तर लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक समजला जाणारा रस्ता याकडे प्राधान्याने लक्ष दिले गेले आहे. याचाच भाग म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहेत. याचा नागरिकांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळातही मोठे व प्रशस्त रस्ते बनविण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे शहराच्या कोणत्याही उपनगरातील ठिकाणी पोहोचणे, तसेच एका उपनगरातून दुसऱ्या उपनगरात जाणे सोयीचे झाले आहे. वेळेची बचत होत असून, त्रासही कमी होत आहे. >ग्रेड सेपरेटरचाही फायदामुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना निगडी ते दापोडी हा साडेबारा किलोमीटर लांबीचा ग्रेड सेपरेटरसह असलेला मार्ग फायदेशीर ठरत आहे. या रस्त्याची एकूण रुंदी तब्बल ६१ मीटर आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच हा मार्ग पार करता येतो. हा मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असतानाही कोठेही वाहतूककोंडी होत नाही, की कसली अडचणही भासत नाही. यासह आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, नाशिक फाटा, कासारवाडी या ठिकाणीही जाता नाही. याचप्रकारे किवळे-सांगवी हा साडेचौदा किलोमीटर लांबीचा बीआरटीएस असलेला मार्गदेखील उपयुक्त ठरत आहे. या रस्त्याची रुंदी ४५ मीटर आहे. मार्गामुळे शहरात काही कारणांनी ‘ट्रॅफिक डायव्हर्जन’ करायचे असल्यास किवळे-सांगवी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. शहराच्या पूर्व-पश्चिम दिशेसाठी हे मार्ग एकप्रकारे सेतू झाले आहेत. शहरातून उत्तरेकडून दक्षिणेला जाण्यासाठी देहू-आळंदी रोड ते काळेवाडी फाटा या दरम्यान साडेदहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता चिखली, जाधववाडी, टेल्को चौक, चिंचवड स्टेशन येथील जुना मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे लाईन, काळेवाडी असा जातो. केएसबी चौक ते हिंजवडी हा रस्तादेखील साडेतेरा किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यामुळेदेखील वाहतूक सोपी झाली आहे. टेल्को रोडदेखील १२ किलोमीटर लांबीचा बनविण्यात आलाआहे. प्रशस्त रस्त्यामुळे निगडीहून भोसरीहून नाशिक रस्त्यालाजाणे सोपे झाले आहे. एकूणच बाहेरून शहरात येणाऱ्या, यासह शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने प्रशस्त रस्ते उपयुक्त ठरत आहेत. हे सर्व रस्ते शहरासाठी एकप्रकारे सेतू बनले आहेत. कोणत्याही दिशेने शहरात येऊन विनाअडथळा इच्छितस्थळी जाणे सोयीचे ठरत आहे. अशा रस्त्यांमुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. यासह वाहतूककोंडी सुटण्यासही मदत होत आहे. काही रस्त्यांची कामे सुरू असून, अशी कामे पूर्णत्वास गेल्यास अधिक सोयीचे होणार आहे.