शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळालेच पाहिजे: उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 24, 2017 03:30 IST

देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जगाला कळावे, यासाठी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळालाच पाहिजे,

ठाणे : देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जगाला कळावे, यासाठी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळालाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केले. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये गेले तीन दिवस सुरू असलेल्या सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उद्धव ठाकरे यांनी सावकरांची महती सांगितली. एवढे वाचन करूनही सावरकर मलाही पूर्णत: समजले नाहीत, अशी प्रांजळ कबुली देत, ही महान व्यक्ती महाराष्ट्रात जन्मली हे आपल्या सर्वांचेच भाग्य असल्याचे ठाकरे म्हणाले. देशावर जेव्हा-जेव्हा गंडांतर आले, तेव्हा-तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत कोणते-ना-कोणते दैवत जन्माला आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर पुरुषांनी केवळ राज्याचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व केले आहे. या थोर पुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, परंतु त्यापूर्वी हे थोर पुरुष स्वत: समजून घेणे आवश्यक आहे. शिवरायांनी वयाच्या १५ व्या वर्षी, तर सावरकरांनी वयाच्या १६ व्या वर्षी देशहितासाठी स्वत:ला झोकून दिले. इंग्रज अधिकाऱ्याचा वध करणारे चाफेकर बंधू हसत-हसत फासावर चढले. एकाच कुटुंबातील तीन मुले फासावर चढण्याचे उदाहरण जगात अन्यत्र कुठेही नसेल. पारतंत्र्याच्या बेड्या आवळत असताना, सावरकरांसारखा सूर्य महाराष्ट्रात जन्माला आला. त्यांनी देशासाठी काय-काय भोगले हे जाणून घेतल्याशिवाय तरुण पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व समजणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न सावरकरांनी पाहिले होते. ते कधी पूर्ण होणार, असा प्रश्न करून, काश्मीरमधील पाकपुरस्कृत हल्ले आणि अरुणाचलमधील गावांची नावे बदलणाऱ्या चीनचा ठाकरे यांनी निषेध केला. जास्तीत जास्त हिंदुंनी सैन्यात भरती व्हावे. साहित्यिकांनीही लेखण्या मोडून बंदुका हाती घ्याव्या, या सावरकरांनी केलेल्या आवाहनाचे स्मरण ठाकरे यांनी करून दिले. सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करणे देशासाठी महत्त्वाचे आहे. सावरकर हे या देशाचे रत्न होते, हे जगाला कळावे, यासाठी ते आवश्यक आहे. सरकार आपलेच आहे. त्यामुळे यासाठी कुणाच्या परवानगीची आहे, असा प्रश्न करून, ही मागणी शासनदरबारी रेटण्यासाठी एकजुटीने समोर येण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले. सावरकर म्हणजे हजारो व्होल्टेज असलेले ऊर्जा केंद्र आहे. हे संमेलन सर्व कार्यकर्त्यांचे परिश्रम आहे, पण संमेलनानंतर आपण सावरकरांचे विचार किती आत्मसात करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकारणाचे हिंदुत्वीकरण झाले पाहिजे आणि सामाजिक समरसता ही सावरकरांची दोन सूत्रे महत्त्वाची असून, ती व्यक्तिगत, सार्वजनिक आणि राजकीय जीवनात प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे, असा आग्रह संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांनी धरला. सावरकरांचे विचार आपल्याला जगावे लागतील, तरच सामर्थ्य निर्माण होईल. कोणताही हिंदू अस्पृश्य असणार नाही. मी माझ्या जातीपुरता मर्यादित राहाणार नाही. आपण सावरकर जगलो, तरच या संमेलनाचे सार्थक होईल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही समयोचित भाषण झाले. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्नने गौरवित करण्याच्या मागणीचा त्यांनी या वेळी पुनरुच्चार केला. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी संमेलनाच्या तीन दिवसांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)संमेलनाध्यक्षांकडून सारवासारवसाहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सावरकर विचारविरोधी नेत्यांना स्थान दिल्याने टीकेचे धनी झालेल्या आयोजकांनी समारोप सोहोळ्यामध्ये परखड विचार मांडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे म्हणाले, झोपणं हा हिंदूंचा स्थायी भाव आहे. फ्रान्स आणि इंग्लंडसारख्या देशांचे पत्रकार भारताच्या सद्यस्थितीचे वर्णन करताना हिंदूंच्या अस्तित्वाचा हा शेवटचा लढा असल्याचे म्हणतात. त्यामुळे आतातरी हिंदूंनी जागले पाहिजे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले, इटालियन महिला देशावर राज्य करण्याचे स्वप्न पाहते. देशात धर्मांतराचा धुमाकूळ सुरु असताना हिंदू जण अस्पृश्यतेच्या भिंतींमध्ये अडकले असतील तर ते लज्जास्पद आहे. एखाद्या जातीवर अन्याय होत असेल, तर तो अन्याय समस्त हिंदूंवर आहे, हे समजून पुढे यावे. ही भावना लोकांमध्ये दृढ झाली तरच संमेलनाचे सार्थक होईल, असे पतंगे म्हणाले.शालेय अभ्यासक्रमात सावरकरांचा समावेश - तावडेस्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहसी जीवन, त्यांचे साहित्य तरुण पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीर, साहित्यिक, साहसी आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून सावरकरांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. विद्यार्थ्यांना इतिहास शिकविण्याच्या पद्धतीवरही तावडे यांनी नापसंती व्यक्त केली. सावरकरांनी समुद्रात कधी उडी मारली, शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला याच्या तारख्या उत्तरपत्रिकेत लिहिल्या की विद्यार्थ्यांना गुण मिळतात. वास्तविक केवळ तारखांपेक्षा या थोर पुरूषांचा इतिहास समजावण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे तावडे म्हणाले.