शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पुण्यात ४४ ठिकाणी शानदार संचलन

By admin | Updated: October 11, 2016 16:53 IST

विजयादशमीच्या मुहुर्तावर समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात ४४ ठिकाणी शानदार संचलन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 11 - विजयादशमीच्या मुहुर्तावर समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात ४४ ठिकाणी शानदार संचलन करण्यात आले. फूलपँट परिधान केलेले शेकडो शिस्तबध्द स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाले होते. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार आजपासून देशभर स्वयंसेवकांना हाफपँटऐवजी फूलपँट वापरण्याची मुभा देण्यात आली.नागरिकांनी ठिकठिकाणी या संचलनाचे स्वागत केले. स्वयंसेवकांनी पांढरा शर्ट, खाकी रंगाची फूलपँट, लोकरीच्या काळ्या टोप्या असा गणवेष परिधान केला होता. घोषपथकाच्या वादनाच्या तालावर शिस्तबध्द पावले टाकणा-या या स्वयंसेवकांना पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती. झेंडुच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. कसबा भागात सकाळी ७ वाजता आरसीएम गुजराती हायस्कूल व गणेश पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिर प्रांगण, साडेसात वाजता पुणे विद्यार्थी गृह, सव्वाआठ वाजता भवानी पेठेतील बालाजी पूरम आणि सायंकाळी 6 वाजता कोरेगाव पार्क भागात कवडेवाडी येथे संचलन झाले.मोतीबाग मुख्यालयाच्या संचलनात बाल तरुण आणि प्रौढ यांची एकाच मैदानावरुन तीन वेगवेगळ्या ठिकाणी संचलने झाली. सुभाषनगर, बाजीराव रस्ता, सदाशिव पेठ या मार्गाने फिरुन संचलन पुन्हा पुणे विद्यार्थी गृहात आले. तेथे प्रार्थना होऊन संचलन पूर्ण झाले.संघाच्या प्रांत प्रचार मंडळाचे सदस्य निखिल वाळिंबे म्हणाले, राजस्थानमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत हााफपँटऐवजी फूलपॅट वापरात आणण्याचा निर्णय झाला होता. देशभरातील संघ स्वयंसेवकांची संख्या लक्षात घेता त्यांना पुरेशा प्रमाणात पँट्सची उपलब्धता व्हावी यासाठी काही महिन्यांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला होता. वाळिंबे म्हणाले संघाने संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या काळापासूनच आवश्यकतेनुसार वेळोवेळी गणवेषात बदल केले आहेत. त्यांच्यावेळी खाकी फेटे होते. खांद्यावर आरएसएस असे लिहिलेले बॅज होते.त्यानंतर बदल करुन सुटसुटीत शर्ट, हाफपँट हा गणवेष झाला. हाफपँट वरुन फूलपँट असा बदल आज जरी आपल्याला माहिती असला तरी चार वर्षांपूर्वी संघाने पट्टयामध्ये बदल केला. सुमित सोनवणे म्हणाले, मी बालपणापासून स्वयंसेवक आहे. गेली अनेक वर्ष संचलनामध्ये सहभागी होतो. मोतीबाग नगराचा शारिरीक शिक्षण प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे.सूर्यनमस्कार, व्यायामाचे अनेक प्रकार, खेळ, शारिरिक प्रात्यक्षिके, दंड धरायचा कसा, फिरवायचा, चालवायचा, त्याचा स्वसंरक्षण म्हणून वापर कसा करायचा हे शिकवले जाते. या वर्षी फूलपँटचा वापर सुरु झाल्याने वेगळा बदल चांगला वाटला.