पुणे : विविध मागण्यासांठी १ आॅक्टोबरपासून सुरू होणारा रेडिओलॉजिस्टचा संप पुढे ढकलण्यात आला असून, तो नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती इंडियन रेडिओलॉजिस्ट अँड इमेजिंग असोसिएशन संघटनेच्या सचिव डॉ. हिमानी तपस्वी यांनी दिली.मात्र, नोव्हेंबरमध्ये हेणाऱ्या आंदोलनात केवळ रेडिओलॉजिस्ट नाही, तर पीसीपीएनडीटी कायद्यात बदल व्हावा, या कायद्यामुळे निष्पाप डॉक्टरांना होणारा त्रास बंद व्हावा, यासाठी अनेक महिन्यांपासून चालू असणारे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. संपामध्ये केवळ रेडिओलॉजिस्ट नाही, तर राज्यातील संपूर्ण वैद्यकीय सेवा सहभागी होणार आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या विविध मागण्यासांठी १ आॅक्टोबरपासून रेडिओलॉजिस्ट संप पुकारणार असल्याची माहिती सांगण्यात आली होती. (प्रतिनिधी)
रेडिओलॉजिस्टचा संप नोव्हेंबरमध्ये
By admin | Updated: October 1, 2016 03:43 IST