शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

लोकमतच्या उपक्रमांची प्रशंसा

By admin | Updated: January 23, 2015 01:31 IST

लोकमतने राबविलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी गुरुवारी प्रशंसा केली़

नांदेड: लोकमतने राबविलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी गुरुवारी प्रशंसा केली़ तसेच जिल्ह्णातील घोगरवाडी, शिवशक्तीनगर, कोलामपोडे, शिवरामखेडा अन् शिवनगर तांड्यावर लोकमतने लोकसहभागातून साकारलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती राज्यपाल राव यांनी आत्मियतेने जाणून घेतली़राज्यपालांनी गुरुवारी सकाळी लोकमतशी संवाद साधला़ यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार उपस्थित होते़ किनवटच्या जंगलातील नैसर्गिक मध अन् बांबूपासून बनविलेल्या वस्तूंना लोकमतने प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वप्रथम दालन खुले केले़ लोकमत आयोजित प्रदर्शनात दोन दिवसांत नांदेडकरांनी ५ क्विंटल मधाची खरेदी केली़ ज्याद्वारे आदिवासी शेतकऱ्यांना सुमारे पावणेदोन लाख रुपयांची मदत झाली़ यासह २ आॅक्टोबर २०१२ पासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची सारांश माहिती राज्यपालांना देण्यात आली़ त्याचे कौतुक करीत राज्यपाल सी़ विद्यासागर यांनी आदिवासी कलेला वाव मिळाला पाहिजे, असे सांगितले़ सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन मुंडे, आदिवासी शेतकरी गुलाबराव मडावी, विजय मडावी यांनीही राज्यपालांशी संवाद साधला. प्रारंभी लोकमतचे उपवृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे यांनी उपक्रमांची माहिती दिली़ (प्रतिनिधी)श्रमदानातून उभारला बंधारा!गावात एखादी योजना वा थेट मदत पोहचविण्याऐवजी आधी लोकांनीच गावासाठी एक तास द्यावा़ श्रमदान करावे, असे ठरले़ त्यातूनच शिवनगर तांडा येथे मातीनाला बंधारा उभारण्यासाठी प्रत्येक घरातील एक जण श्रमदानासाठी पुढे आला़ सुमारे ५ लाख रुपये खर्च आला असता इतका बंधारा केवळ श्रमदानातून उभाही राहिला़ बंधाऱ्यात सुमारे ४२ हेक्टरमधील पाणी जमा होईल़ त्याची साठवण क्षमताही १़८० मीटर इतकी असणार आहे़ लोकमतचे लोकाभिमुख उपक्रम उदाहरण देण्यासारखे आहेत़ विशेषत: शिवरामखेड्याच्या मधसंकलन समितीला प्रदर्शनाच्या माध्यमातून बळकटी आली़ आदिवासी प्रकल्प कार्यालय तसेच जिल्हा प्रशासनही मध व बांबूच्या वस्तू निर्मिती, प्रशिक्षण तसेच विक्रीसाठी कायम व्यवस्था उभी करेल़ - धीरजकुमार, जिल्हाधिकारी , नांदेड