शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

प्लॅस्टिकमधील औषधे घातक !

By admin | Updated: December 8, 2014 03:00 IST

काच फुटण्याच्या भीतीने अनेक वस्तू या प्लॅस्टिकच्या वापरल्या जातात. हेच प्रमाण मानून द्रव औषधांसाठीही प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्रासपणे वापरल्या जातात

मुंबई : काच फुटण्याच्या भीतीने अनेक वस्तू या प्लॅस्टिकच्या वापरल्या जातात. हेच प्रमाण मानून द्रव औषधांसाठीही प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्रासपणे वापरल्या जातात. मात्र औषधांसाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या होणाऱ्या वापरामुळे ते आरोग्यास घातक ठरू शकते, असे अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधनांतून समोर आले आहे. यामुळेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘अ‍ॅक्ट इंडिया’ अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गतच लहान मुले, वृद्ध तसेच गरोदर महिला आणि प्रजननशील वयोगटातील महिलांसाठीच्या औषधांची प्राथमिक साठवणूक पॉलिथिलिन टेरेफॅलेट्स किंवा प्लॅस्टिक कंटेनर्समध्ये करण्यास प्रतिबंध करण्याची शिफारस ड्रग्ज टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्डने केली आहे. या प्लॅस्टिक बॉटल्सच्या २० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानात असल्यास विशिष्ट तपासण्या केल्या जातात. भारतात सर्वसाधारण तापमान हे २० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. या बाटल्यांमध्ये औषध दीर्घकाळ साठवल्याने त्यात विषारी घटक उतरतात. प्लॅस्टिकचे विघटन होण्यास ३०० वर्षे जावी लागतात. काच कशातही मिसळत नसल्याने काचेच्या बाटल्या वापरणे योग्य ठरते, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)