शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या नातलगांना एमआयडीसीची जागा

By admin | Updated: May 24, 2016 03:00 IST

भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली ४० कोटी रुपयांची ३ एकर जागा राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे

पुणे : भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली ४० कोटी रुपयांची ३ एकर जागा राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. पिंपरी-चिंचवड येथील भोसरी एमआयडीसीमधील अब्बास रसुलभाई उकानी यांच्या मालकीची ३ एकर जागा एमआयडीसीने २५ वर्षांपूर्वी संपादित केली होती. परंतु भूसंपादनाची कारवाई पूर्ण न केल्याने सदर जमीन परत मिळावी म्हणून उकानी यांनी सप्टेंबर २०१५मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी महसूल विभागाकडे दावा दाखल केला होता. महसूल विभागाकडे याबाबतचा दावा प्रलंबित असताना मंत्री खडसे यांनी उकानी यांच्याकडून २८ एप्रिल २०१६ रोजी ही जमीन खरेदी केली आहे. पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने हा व्यवहार झाला आहे, असा दावा गावंडे यांनी केला आहे.भोसरीतील या ३ एकर जमिनीची किंमत ४० कोटी रुपये इतकी असून, तिचा ताबा एमआयडीसीकडे आहे. या जागेवर एमआयडीसीकडून औद्योगिक वापरासाठी प्लॉट पाडण्यात आले आहेत. तरीही खडसे यांनी परस्पर पत्नी व जावयाच्या नावाने उकानी यांच्याकडून ही जमीन खरेदी केली. या व्यवहारापोटी १ कोटी ३७ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले. या जमिनीचा ७/१२ एमआयडीसीच्या नावाने असतानाही हवेलीच्या दुय्यम निबंधक कार्यालयाने हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार कसा होऊ दिला, असा सवालही गावंडे यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)जमीन खरेदीत गैरव्यवहार नाहीमौजे भोसरी येथील संबंधित जमिनीबाबतची भूसंपादन कार्यवाही एमआयडीसीने पूर्ण केलेली नसून ती जमीन आजही मूळ मालकाच्या नावे आहे. त्यामुळे श्रीमती मंदाकिनी खडसे व इतर एक यांनी केलेल्या जमीन खरेदी व्यवहारात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असा खुलासा महसूल विभागाने केला आहे. मौजे भोसरी, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हे नं. ५२/२/अ/२, क्षेत्र १ हे. २१ आर या जमिनीच्या ७/१२वर मालकाचे नाव रकान्यात अब्बास रसुलभाई उकानी असे नमूद आहे. ही जमीन उकानी यांच्या मालकीची असून, ती निर्बंधमुक्त आहे. ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात जरी एम.आय.डी.सी. (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) यांचे नाव असले आणि या जमिनीच्या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१मधील कलम ३२(१)नुसार दिनांक ११ नोव्हेंबर, १९७१ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या प्रकरणामध्ये ठरवून दिलेल्या मुदतीत निर्णय घोषित करण्यात आलेला नाही. तसेच केंद्राच्या नवीन भूसंपादन कायद्याच्या कलम २४नुसार सदर अधिनियमात रीतसर ताबा महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाने घेतलेला नाही. जमीन मालकास कोणताही मोबदला अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबतची भूसंपादनाची प्रक्रिया आपोआप व्यपगत ठरते. सदर जमीन श्रीमती मंदाकिनी खडसे व इतर एक यांनी दिनांक २८ एप्रिल, २०१६ रोजी नोंदणीकृत दस्तान्वये उकानी यांचेकडून खरेदी केली आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम व नोंदणी अधिनियम अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया राबवून संबंधित खरेदी व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे.