शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाटे, वरवंटे, खलबत्ते चालले मिक्सरमुळे विस्मृतीत

By admin | Updated: June 10, 2016 03:28 IST

दगड काम करणारा वडार -पाथरवट समाज हा व्यवसायिक काळाच्या ओघात अडचणीत सापडला आहे़

राहुल वाडेकर,

तलवाडा- परंपरेने पिढीजात चालत आलेला दगड काम करणारा वडार -पाथरवट समाज हा व्यवसायिक काळाच्या ओघात अडचणीत सापडला आहे़ त्यातही या समाजाची व्यथा ही वेगळीच म्हणावी लागेल ़भटकंती करुन संसाराचा गाडा हाकलताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागतेच पण वाढत्या महागाईत कसा तग धरुन राहायचे, हा प्रश्न त्यांच्या अस्तित्वाचा ठरतो आहे. हातावर काम करणारी आणि गावोगावी फिरत पाटयाला टाके लाऊन घ्या वो ताई, अशी आरोळी देणारा कारागीर सध्या शहरातच काय पण गावातही दिस नाही़ घरातील पाटा-वरवंटयांची जागा आधुनिक मिक्सरने घेतल्याने दगडापासून पाटा, वरवंटा, खलबत्ते बनविणाऱ्या कारागिरांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे़दहा-पंधरा वर्षापूर्वी घरातील स्वयंपाक खोलीत दगडी पाटी-वरवंटयाला हक्काचे व मानाचे स्थान होते़ पाटा वरवंटयावर केलेल्या वाटणाची चव आजच्या मिक्सरमधील चटणीला येत नसली तरी आजच्या धावपळीच्या जगात या वस्तू अडगळीच्या वाटू लागल्या आहेत़ त्यामुळे नविन पाटे वरवंटे विक्री खरेदी करणे वा त्या वस्तूंना टाके लावुन घेण्याचे प्रमाणही कमी झाल्याने पाथरवट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ग्रामीण भागात काही ठिकाणी गृहपयोगी कामासाठी दगडी वस्तूंचा वापर जास्त होतांना दिसत असला तरी शहरीकरणाचे वारे वेगाने वाहू लागल्याने घरातील पाटा वरवंटा किती काळ तग धरेल हे सांगता येत नाही़ ग्रामीण भागात भारनियमन मोठया प्रमाणात होत असल्याने या काळात या वस्तूंची निवड जाणवते़ घरात मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या पाचवीच्या कार्यक्रमाला पाटा तर बारशाच्या दिवशी वरवंटयासाठी शोधाशोध सुरु होते़ म्हणून या दोन वस्तू टिकून आहेत.