मुंबई : आॅनलाइन दत्तक पद्धतीत मुलांचे फोटो सर्वांसाठी उघड केले जातात. तसे न होता अशा मुलांचे फोटो फक्त इच्छुक पालकांनाच दिसतील, त्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल केले जातील, असे आश्वासन महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. शिवसेना सदस्य नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नव्या बाल न्याय अधिनियमानुसार दत्तक मुले घेण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्रीय प्राधिकरणाची नियमावली ग्राह्य मानली असून, सामाजिक संस्थांच्या काही मागण्या धुडकावून लावल्या आहेत. राज्य सरकारने ही प्रक्रिया आॅनलाइन केली आहे. (प्रतिनिधी)
मूल दत्तक प्रक्रियेत गुप्तता पाळणार - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 05:07 IST