शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या दशकभरात २ लाख शेतक-यांनी सोडली शेती

By admin | Updated: August 29, 2015 13:16 IST

गेल्या दशकभरात महाराष्ट्राकील २ लाख शेतक-यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला शेती व्यवसाय सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २९ - गेल्या दशकभरात महाराष्ट्रातील २ लाख शेतक-यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला शेती व्यवसाय सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या कृषी जनगणनेच्या आकड्यांनुसार ही माहिती समोर आली आहे. उदरनिर्वाहासाठी उपलब्ध असलेले इतर पर्याय व दरवर्षी शेतीत होणा-या नुकसानामुळे शेतक-यांच्या सहनशक्तीचा अंत होऊन, हा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 
२००५-०६ सालच्या जनगणनेनुसार राज्यात कृषीक्षेत्रावर अवलंबून असलेल्या शेतक-यांची संख्या १ कोटी ३७ लाख इतकी होती, मात्र ताज्या जनगणनेनुसार आता हा आकडा १ कोटी ३५ लाख इतका झाला आहे, असे राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. नवनवीन उद्योग, रस्ता रुंदीकरणा व रस्तेबांधणी आदी बाबी जमीनींचा घास गिळत असल्याने हा आकडा कमी होत चालला आहे, असे खडसे यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रातील १ कोटी ३५ लाख शेतकरी कृषीक्षेत्रावर अवलंबून असून ९० लाख शेतक-यांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे खडसे म्हणाले.  कुटुंबात होणा-या वाटण्यांमुळे शेताचा आकार आणखीनच कमी होत असून त्यामुळे उत्पन्नावरही विपरीत प्रभाव पडतो. त्या शेतक-यांव्यतिरिक्त ४५ लाख शेतकरी असे आहेत जे लहान, मध्यम व मोठ्या स्तरावर शेती करतात, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धान्य पिकवण्याची क्षमता असून ते बाजारात विकता येऊ शकते, असेही खडसे म्हणाले.
वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या ५-६ दशकांमध्ये शेतक-यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र २०१०-११ पासून राज्यातील शेतक-यांची संख्या घटू लागली. २०१०-११पर्यंत राज्यात १.३७ कोटी शेतकरी होते, मात्र २०१३-१४ पर्यंत त्यांची संख्या घटली. 
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील सहाय्यक प्राध्यापक संगीता श्रॉफ यांच्या सांगण्यानुसार सध्या राज्यातील स्थिती अतिशय गंभीर आहे. ' राज्यातील एकूण श्रमिक वर्गापैकी ५२.७ टक्के हे शेती व्यवसायातील असून २५.४ टक्के लोकांची स्वत:ची शेती आहे तर २७.३ टक्के नागरिक दुस-यांची शेती कसतात. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबादमधील श्रमिकांचा आकडा हटवल्यास कृषी क्षेत्रातील रोजगाराची टक्केवारी ८१.३६ टक्क्यांच्या आसपास आहे, याचाच अर्थ ग्रामीण भागातील लोकांसमोर उदरनिर्वाहासाठी शेतीशिवाय इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत, असे त्या म्हणाल्या.