शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी व्हिसासाठी केवळ ३० टक्केच महिला अर्जदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 04:42 IST

अमेरिकेतील साडेचार हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमेरिकेतील साडेचार हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. भारत आणि चीनमधील विद्यार्थी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात येत आहेत; परंतु भारतातून विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यामध्ये महिलांचे प्रमाण केवळ ३० टक्क्यांपर्यंतच आहे. वस्तुत: अमेरिकेत मुलांइतक्याच शिक्षण आणि करिअरच्या संधी मुलींनाही उपलब्ध आहेत. तरीही ७० टक्क्यांहून अधिक अर्ज पुरुषांकडूनच यावेत, हे अचंबित करणारे आहे, असे मत मुंबईतील अमेरिकी दूतावासातील काऊन्सेलर चिफ मायकल इवान्स यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.८ जून हा दिवस देशभरातील अमेरिकी दूतावासांमध्ये ‘विद्यार्थी व्हिसा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी देशभरातील पाचही दूतावासांमध्ये केवळ शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांना व्हिसा दिले जातात. त्यानिमित्त गुरुवारी मुंबईतील दूतावासात सुमारे तेराशे व्हिसा इच्छुक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी मायकल इवान्स, दूतावासातील उपमुख्य अधिकारी जेनिफर लार्सन, युनायटेड स्टेट्स - इंडिया इज्युकेशनल फाउंडेशनचे विभागीय अधिकारी रायन परेरा आणि अमेरिकेत शिक्षण घेणारे काही भारतीय विद्यार्थी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मॉडेल आणि सूत्रसंचालिका लिझा मंगलदास हिने या वेळी तिचे अमेरिकेतील शिक्षणादरम्यानचे अनुभव कथन केले. कोलंबियामध्ये शिकताना खऱ्या अर्थाने जगाची कवाडे आपल्यासाठी उघडली गेल्याचे ती म्हणाली.विद्यापीठांमधील विविधता आणि दर्जा अधिक उंचाविण्यासाठी अमेरिका जगभरातील विद्यार्थ्यांचे कायमच स्वागत करते, असे या वेळी जेनिफर म्हणाल्या. ‘अमेरिकेत कलागुणांच्या विकासाला पूर्णत: वाव आहे. केवळ बँक बॅलेन्स, भाषा कौशल्य अशा गोष्टी पाहून शैक्षणिक व्हिसा देत नाही. त्याऐवजी आत्मविश्वास, शिक्षणाची ऊर्मी आणि प्रामाणिकपणा याच गोष्टी मुलाखतीदरम्यान तपासून पाहतो. कोणत्याही अनावश्यक कारणासाठी व्हिसा नाकारणे, अडवून ठेवणे असे आमच्याकडून कधीही होत नाही. त्यातही काही कारणाने व्हिसा नाकारला गेलाच, तर पुन्हा अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहेच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुलाखतीला येताना कोणतेच दडपण घेऊ नये, असे मायकल यांनी या वेळी स्पष्ट केले.मुंबईतील रुईया महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला मूळचा सोलापूरचा नचिकेत थोरात सध्या अमेरिकेतील टोलेडो विद्यापीठात संगणक विज्ञान विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे शिक्षणाचा फारसा आर्थिक भार पडत नसल्याचे तो सांगतो. तो विद्यपीठाच्या टेबल टेनिस टीममध्ये आहे. तेथील शिक्षण पद्धतीत फारच स्वातंत्र्य आहे. त्यामुळे अनेक नवीन गोष्टी शिकायला वाव मिळत असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले.