शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

एकतर्फी प्रेमातून झाडली गोळी

By admin | Updated: October 19, 2014 01:01 IST

मुलगी देण्यास नकार देऊन, मुलीला मागणी घालणाऱ्याचा चारचौघात पाणउतारा केल्यामुळे आरोपी तरुणाने मुलीच्या आईवर गोळी झाडली. आज सकाळी ८ च्या सुमारास सिरसपेठ (इमामवाडा) परिसरात ही थरारक घटना घडली.

महिला गंभीर - आरोपी फरार नागपूर : मुलगी देण्यास नकार देऊन, मुलीला मागणी घालणाऱ्याचा चारचौघात पाणउतारा केल्यामुळे आरोपी तरुणाने मुलीच्या आईवर गोळी झाडली. आज सकाळी ८ च्या सुमारास सिरसपेठ (इमामवाडा) परिसरात ही थरारक घटना घडली. या गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचे नाव गीता सुखदेवराव डोंगरे (वय ४५) आहे. त्या सिरसपेठमध्ये राहतात. तिचे पती टेम्पो चालवतात. आरोपीचे नाव प्रभाकर पंडित (वय २८) आहे. तो खरबीत राहतो. तो टाईल्स फिटिंगचे काम करतो. गीता डोंगरे यांचा पुतण्या नरेंद्र पाटील हा आरोपी प्रभाकरसोबत काम करतो. सहा महिन्यांपूर्वी नरेंद्रच्या ओळखीतून गीता यांनी आपल्या घरी टाईल्स फिटिंगचे काम प्रभाकरला दिले होते. तेव्हापासून तो अधूनमधून गीता यांच्या घरी यायचा. गीता यांच्या मुलीशी त्याची मैत्री झाली. तो तिच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो प्रयत्नरत होता. त्याने यापूर्वी एकदा गीता यांना त्यांच्या मुलीची मागणी घातली होती. गीता यांनी त्याची प्रेमाने समजूत काढून त्याला नकार दिला होता.आरोपी प्रभाकर तेव्हापासून जास्तच आक्रमक झाला. तो गीता यांच्या मुलीला वारंवार संपर्क करायचा. आज सकाळी ८ च्या सुमारास प्रभाकर गीता यांच्या घरी पोहोचला. त्याने पुन्हा लग्नाची गोष्ट काढून मुलीची मागणी घातली. गीता यांनी ती धुडकावून लावतानाच आरोपी प्रभाकरची खरडपट्टीही काढली. शेजाऱ्यांसमोर झालेला पाणउतारा सहन न झाल्यामुळे आरोपी प्रभाकरने जवळ लपवून ठेवलेला देशीकट्टा काढला आणि गीता यांच्यावर गोळी झाडली. गोळी खांदा आणि मानेच्या मधल्या भागात लागली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या गीता यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. माहिती कळताच इमामवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नरेंद्र पाटीलच्या माध्यमातून आरोपीच्या घराचा पत्ता शोधला, मात्र तो घरी आढळला नाही. गीता यांच्या बयानावरून इमामवाडा पोलिसांनी कलम ३०७ भादंवि तसेच ३/२५ हत्यार कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)आरोपी बिहारकडे पळाला ?आरोपी प्रभाकर पंडित हा मूळचा बिहारमधील रहिवासी आहे. गीता यांच्यावर गोळी झाडल्यानंतर तो मोटरसायकलने रेल्वेस्थानकाकडे पळून गेला. तो बिहारकडे पळाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तो बिहारमधूनच आलेल्या काही सहकाऱ्यांच्या आश्रयाला असावा, असाही अंदाज आहे. त्यामुळे नागपूरसह बिहारी कारागिरांच्या ठिकठिकाणच्या राहुट्यांवरही त्याचा शोध घेतला जात आहे.