शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दीड एकरात चंदनाचा दरवळ!

By admin | Updated: July 11, 2016 05:45 IST

सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या वाशिम तथा हिंगोली जिल्ह्यांतील दोन शेतकऱ्यांनी दीड एकरात चंदनाच्या सहाशे वृक्षांची लागवड करून श्रमशेतीचा आदर्श ठेवला आहे.

वाशिम : सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या वाशिम तथा हिंगोली जिल्ह्यांतील दोन शेतकऱ्यांनी दीड एकरात चंदनाच्या सहाशे वृक्षांची लागवड करून श्रमशेतीचा आदर्श ठेवला आहे.मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याचा पट्टा सदैव अवर्षणग्रस्त म्हणून गणला जातो. कमकुवत आर्थिक स्थिती तसेच शास्त्रीय ज्ञानाचा अभाव, यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन, हरबरा आदी पारंपरीक पिकांवरच समाधान मानतात. अशा परिस्थितीत वाशिम जिल्ह्यालगत असलेल्या कडोळी येथील युवा शेतकरी सुनिल कदम व संतोष भादलकर यांनीत्यांच्या दीड एकर संयुक्त शेतीमध्ये चंदनाच्या रोपांची लागवड केली. त्यांच्याकडे आठ एकर बागायती शेती आहे. ठिंबक सिंचनाची सोय आहे. या युवा शेतकऱ्यांनी याआधी सोयाबीन, हरभरा यासारखी पारंपरीक पिके घेतली. परंतु त्यातून फारसे काही हाती लागत नसल्यामुळे लातुर येथील शेतकरी बगदुरे यांच्या मार्गदर्शनानुसार गतवर्षी नोव्हेंबरमध्ये तुलनेने नगण्य पाणी लागणाऱ्या चंदनाची रोपे लावली. त्यामुळे आता त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.चंदन परजीवी असल्यामुळे या रोपांजवळ त्यांनी तुरीचे झाड लावले. रोपे लावल्यापासुन रोपांची नियमित काळजी, वेळेच्या वेळेला पाणी, खत याची फलश्रुती म्हणून आजच्या घडीला ही चंदनाची रोपे तब्बल ७ ते ८ फूट उंच वाढली आहेत. (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणीचंदन रोपांना अन्य पिकांच्या तुलनेत केवळ १० ते १५ टक्केच पाणी द्यावे लागते. इतर देशांतील चंदनाच्या तुलनेत भारतातील चंदनाच्या झाडात सुगंध व तेलाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे भारतीय चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. भारतात चंदनाच्या सुगंधी गाभ्याची किंमत सहा ते आठ हजार रुपये प्रतिकिलो आहे. १५ वर्षांत चंदनाच्या झाडाची पूर्ण वाढ होते. पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या एका झाडापासून अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न प्राप्त होते.