शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची भाषा प्रमाण नव्हे

By admin | Updated: April 4, 2015 23:36 IST

पुण्याची भाषा म्हणजे प्रमाण भाषा असा समज वर्षानुवर्षे आपल्याकडे आहे. मात्र, पुण्याची भाषा प्रमाण नव्हे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी आज साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडले.

राजन खान यांचे मत : संमेलनात भाषेवर अभिरूप न्यायालयस्रेहा मोरे - (संत नामदेवनगरी) पुण्याची भाषा म्हणजे प्रमाण भाषा असा समज वर्षानुवर्षे आपल्याकडे आहे. मात्र, पुण्याची भाषा प्रमाण नव्हे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी आज साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडले. ‘दृकश्राव्य माध्यमातील संहितालेखन’ या विषयावर संमेलनात अभिरूप न्यायालय आयोजित करण्यात आले होते. या न्यायालयात आकाशवाणीच्या रसिका देशमुख, लेखक-अभिनेते संजय मोने, अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी न्यायमूर्र्तींची भूमिका बजावली. ‘मराठी भाषा’ या विषयावर मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी न्यायालयात सर्वांना बोलते केले. सध्या अस्तित्वात असलेली मराठी भाषा मूळची मराठी नाही. या भाषेत ६० ते ७० टक्के इतर भाषेतील शब्द सामावले आहेत. त्यामुळे आता माध्यम आणि साहित्यिकांनी भाषा टिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे खान यांनी सांगितले. मातृभाषेत बोललो नाही तर ती शिवी समजावी अशी भूमिका घेत प्रत्येकाने मराठीत बोलले पाहिजे, असे परखड मत संजय मोने यांनी मांडले. पाठ्यपुस्तकातील भाषा भंपक महाराष्ट्राचे अनेक तुकडे आहेत, त्यामुळे कोणत्याही ठरावीक भाषेला प्रमाण म्हणणे चुकीचे आहे. जो माणूस ज्या संस्कारात वाढला ती प्रमाण भाषा असते. सध्या पाठ्यपुस्तकातील भाषा ही अतिशय भंपक असल्याची टीका राजन खान यांनी केली.राजन खान यांचा प्रथमच सहभागरोखठोक बोलीसाठी प्रसिद्ध असलेले व वेळोवेळी साहित्य महामंडळाला सुनावणारे राजन खान आज प्रथमच संमेलनात सहभागी झाले होते. त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.नाट्यक्षेत्रातील संवादाबद्दल मोहन जोशी म्हणाले, आजकाल नाटकांमध्ये शॉर्टकट आणि उथळ लिखाण केले जाते. संहिता कितीही कमकुवत असली तरी संपूर्ण ताकदीनिशी ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कलाकारांना करावे लागते.अभिरूप न्यायालयाच्या समारोपाप्रसंगी न्यायमूर्तीच्या भूमिकेत असलेले रामदास फुटाणे म्हणाले, प्रत्येकाने मातृभाषेचा बळी जाऊ नये याची काळजी घ्यावी. बालकुमार साहित्य संमेलनांची संख्या वाढविण्याची सूचनाही त्यांनी शासनाला केली. ‘रती इंग्रजीची रचू लागली, अजाण मुळाखाली माती खचू लागली’ असे आपल्या शैलीत सांगत इतर भाषांचा सन्मान करा, असा सल्लाही त्यांनी दिला.