सातारा : काँग्रेस, भाजपा, शिवसेना या पारंपरिक शत्रूंना एकीकडे तोंड देत असतानाच दुसरीकडे पक्षाचेच खासदार असलेल्या उदयनराजे विरोधात संघर्ष करण्याची पाळी आलेल्या राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा आपले बहुमत सिद्ध केले. गेल्या पाच वर्षांतील संख्याबळालाही मागे टाकत राष्ट्रवादीने सातारा जिल्हा परिषदेत जणू चमत्कारच घडविला. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागतील, असे खुद्द राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते बोलून दाखवत होते. मात्र, काँग्रेस अन् पक्षाच्या बंडखोरांना चारीमुंड्या चित करत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत बाजी मारली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप या दोघांचा जिल्हा परिषद मतदारसंघातील पराभव संबंधित नेत्यांसाठी धक्कादायक ठरला आहे. विशेष म्हणजे, ११ पैकी १० पंचायत समितीत स्पष्ट बहुमत मिळवून ग्रामीण भागातील वर्चस्व राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सिद्ध केले. केवळ कऱ्हाड पंचायत समितीत कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने त्या ठिकाणी भाजपा स्थानिक आघाड्यांच्या मदतीने सत्तेवर येऊ शकतो. सातारापक्षजागाभाजपा०७शिवसेना०१काँग्रेस०७राष्ट्रवादी३९इतर१०
राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत
By admin | Updated: February 24, 2017 04:35 IST