ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरचे महापौरपद शिंदेसेनेकडे, उपमहापौरपद भाजपाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 07:31 IST2026-01-31T07:29:46+5:302026-01-31T07:31:42+5:30

Municipal Mayor Election: महामुंबईतील ९ महापालिकांपैकी ठाणे, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर या ३ महापालिकांमध्ये महापौरपदासाठी फक्त शिंदेसेनेच्याच उमेदवारांचे अर्ज आले. त्यामुळे या तिन्ही महापालिकांत आपला महापौर बसवण्यात शिंदे सेनेला यश आले.

Municipal Mayor Election: Shiv Sena wins mayoral posts in Thane, Kalyan-Dombivli, Ulhasnagar | ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरचे महापौरपद शिंदेसेनेकडे, उपमहापौरपद भाजपाकडे

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरचे महापौरपद शिंदेसेनेकडे, उपमहापौरपद भाजपाकडे

मुंबई -  महामुंबईतील ९ महापालिकांपैकी ठाणे, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर या ३ महापालिकांमध्ये महापौरपदासाठी फक्त शिंदेसेनेच्याच उमेदवारांचे अर्ज आले. त्यामुळे या तिन्ही महापालिकांत आपला महापौर बसवण्यात शिंदे सेनेला यश आले. मिरा-भाईंदरमध्ये काॅंग्रेसने महापौर पदाचा उमेदवार दिला आहे. मात्र बहुमताच्या जाेरावर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. वसईमध्ये मात्र महापाैर-उपमहापाैर निवडीत बविआच्या विरोधात भाजपने अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे.

ठाण्याच्या महापौरपदी शिंदेसेनेच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी शुक्रवारी अर्ज भरला. तर दोन वर्षांसाठी महापौरपद द्या, अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेऊ असे म्हणणाऱ्या भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठीअर्ज दाखल केला. त्यामुळे महापौरपद शिंदेसेनेला मिळणार हे निश्चित झाले. पिंपळोलकर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडीतून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी शिंदेसेनेच्या हर्षाली थवील-चौधरी, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. मात्र विरोधात कोणाचेही अर्ज दाखल न झाल्याने ही निवड बिनविरोध निश्चित आहे.

उल्हासनगरमध्ये महापौरपदासाठी शिंदेसेनेतील ओमी कलानी समर्थक अश्विनी निकम, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे नगरसेवक अमर लुंड यांनी अर्ज दाखल केला. मात्र महापौर व उपमहापौरपद किती वर्षांसाठी असेल, याबाबत शिंदेसेनेचे खा. श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले नाही. 

मिरा-भाईंदरमध्ये बहुमताची मदत 
मिरा-भाईंदर पालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या वतीने आमदार नरेंद्र मेहता यांच्या भावजय डिंपल मेहता यांनी, तर उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांनी अर्ज भरला. भाजपच्या या दोघांचीही निवड निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे मिरा-भाईंदर विकास आघाडीच्या वतीने काॅंग्रेसकडून महापौरपदासाठी, तर शिंदेसेनेकडून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र बहुमताच्या बळावर त्यांच्या विजय निश्चित मानला जात आहे.

वसईच्या महापौर पदासाठी बविआ भाजपमध्ये लढत : वसई-विरारमध्ये निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी बविआसह भाजपनेही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापौरपदासाठी बविआतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निषाद चोरघे तर भाजपतर्फे ॲड. दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज सादर केले आहेत. तर उपमहापौरपदासाठी बविआकडून कन्हय्या भोईर व मार्शल लोपीस तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी अर्ज भरले आहेत. 


 

Web Title : ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर में शिंदे सेना के महापौर; भाजपा को उपमहापौर पद।

Web Summary : शिंदे सेना ने ठाणे, कल्याण-डोंबिवली और उल्हासनगर में निर्विरोध महापौर पद जीते। मीरा-भायंदर में भाजपा की संभावित जीत। वसई में बीवीए और भाजपा के बीच महापौर पद के लिए मुकाबला।

Web Title : Shinde Sena secures Thane, Kalyan-Dombivli, Ulhasnagar Mayor posts; BJP gets Deputy.

Web Summary : Shinde Sena won Mayor posts in Thane, Kalyan-Dombivli, and Ulhasnagar, unchallenged. Mira-Bhayandar sees likely BJP victory. Vasai witnesses a competitive battle between BVA and BJP for mayoral roles.