शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नगर परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढणार!

By admin | Updated: August 4, 2016 02:18 IST

सध्या पालकांचा ओढा हा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकविण्याचा जास्त असतो

वैभव गायकर,

पनवेल- सध्या पालकांचा ओढा हा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकविण्याचा जास्त असतो. अगदी गरीब ते मध्यमवर्गीय पालकांचा आग्रह असतो की आपला पाल्य हा इंग्रजी माध्यमातच शिकला पाहिजे. याचा परिणाम राजिप व नगरपरिषदेच्या शाळांवर होतो व त्याठिकाणची पटसंख्या आपोआपच कमी होते. यावर पर्याय म्हणून पनवेल नगरपरिषद १ ते ७ वी इयत्तेमधील विद्यार्थ्यांसाठी ड्रीम प्रोजेक्ट राबवत असून या प्रकल्पाअंतर्गत मुलांना प्रेरणा देण्यासाठी एका सॉफ्टवेअरद्वारे भविष्यातील आव्हाने व करिअरच्या वाटा याची माहिती देण्यात येणार आहे. २०१५ - १६ मध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर केवळ ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला होता. नगरपरिषदेच्या ११ पैकी १० शाळेतील एकूण ३५० विद्यार्थ्यांसाठी हा ड्रीम प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे यावर्षी इयत्ता १ ते ७ वीपर्यंत हा प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश गरीब व गरजू विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. अभियंता, डॉक्टर, पायलट, शिक्षक, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आदीसह आदर्श पद भूषविणाऱ्या व्यक्तींद्वारे या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात येणार आहे. कॅमेऱ्यातून फोटो काढून एका सॉफ्टवेअरद्वारे या विद्यार्थ्यांचे फोटो त्याठिकाणी अपलोड करुन विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या अशा क्षेत्रातील डॉक्टर, अभियंता, पायलट आदींच्या डे्रस कोडवर त्या विद्यार्थ्यांचा चेहरा असलेला फोटो लावून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची फोटो फ्रेम करून भेट देण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्याला काय व्हायचे आहे हे स्वप्न सतत त्यांच्या डोळ्यासमोर राहील हा त्याच्यामागचा उद्देश असल्याची माहिती नगरपरिषदेच्या शिक्षणाधिकारी एन.पी. वैदू यांनी दिली. त्याकरिता आम्ही या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या ड्रीम प्रोजेक्टची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक व प्रत्येक वर्गातील वर्गशिक्षकांवर सोपविण्यात आली आहे.याकरिता वार्षिक ३० हजार रुपये खर्च अपेक्षित आहेत. नगरपरिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी अ‍ॅबीलीटी बेस लर्निंग सिस्टीम (एबीएल) हा उपक्रम राबविला जात आहे. या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. विशेष म्हणजे शाळांची दुरवस्था देखील याला कारणीभूत आहे. त्याकरिता शाळांचा दर्जा देखील सुधारण्याची गरज आहे ज्यामुळे पालकांना देखील आपल्या मुलांना नगरपरिषदेच्या शाळेत टाकावेसे वाटेल. ।प्रशासन अधिकारी यांच्या अहवालानुसार पनवेल नगरपरिषदेच्या ११ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये ३ री ते ७ वीपर्यंत एकूण १८९२ गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासंदर्भात शेकापचे नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी सांगितलेकी, नगरपरिषद केवळ विविध उपक्रम कागदोपत्री राबवत आहेत. अशा प्रकारच्या योजना स्तुत्य असल्यातरी त्याची अंमलबजावणी होणे गरजेची आहे. आजही पनवेल कोळीवाड्यामधील एकही मुलगी सातवीच्या पुढे शिकली नाही.