शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २५ लाखांहून जास्त खटले प्रलंबित

By admin | Updated: August 23, 2015 01:59 IST

पोलीस आणि सरकारी वकिलांच्या एकत्रित, प्रामाणिक प्रयत्नांमधूनच दोषसिद्धी दर वाढतो. म्हणजेच जास्तीतजास्त खटल्यांमध्ये सबळ पुराव्यांआधारे न्यायालय आरोपींना शिक्षा ठोठावते

मुंबई : पोलीस आणि सरकारी वकिलांच्या एकत्रित, प्रामाणिक प्रयत्नांमधूनच दोषसिद्धी दर वाढतो. म्हणजेच जास्तीतजास्त खटल्यांमध्ये सबळ पुराव्यांआधारे न्यायालय आरोपींना शिक्षा ठोठावते. ही शिक्षा समाजात कठोर संदेश पसरवते आणि आरोपी गुन्हे करण्यास धजावत नाहीत. महाराष्ट्रात मात्र दोषसिद्धीदर अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे निरीक्षण नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नोंदवले आहे. धक्कादायक म्हणजे प्रलंबित खटल्यांच्या बाबतीत महाराष्ट्राने उत्तर प्रदेश व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातवर मात करत प्रथम स्थान पटकावले आहे. २०१४मध्ये जुने, नवे असे मिळून एकूण २५ लाख ७९ हजार खटले विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. उत्तर प्रदेशात २३ लाख २१ हजार तर गुजरातेत २१ लाख २४ हजार खटले प्रलंबित आहेत. भारतीय दंड विधान व स्थानिक कायद्यांनुसार देशभरात १ कोटी ९४ लाख २६ हजार खटल्यांची सुनावणी २०१४मध्ये न्यायालयांनी घेतली. ४९ लाख ९० हजार खटल्यांचा निकाल २०१४मध्ये लागला. त्यात ३९ लाख खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली तर १० लाख खटल्यांमधील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशाचा दोषसिद्धी दर ४५.१ (भादंवि) आणि ९२.७ (स्थानिक कायदे) असा आहे. मात्र महाराष्ट्रात हाच दर १९.३ (भादंवि) आणि २६.५ (स्थानिक कायदे) इतका कमी आहे. भारतीय दंड विधानानुसार दाखल खटल्यांच्या दोषसिद्धी दरात ईशान्येकडील मिझोराम, नागालॅण्ड ही राज्ये सर्वांत अव्वल आहेत. केरळ, तामिळनाडू ही राज्ये तिसऱ्या, चौथ्या स्थानी आहेत. आसाम, बिहार, ओडीशा, पश्चिम बंगाल, दिव-दमण, दादरानगर हवेली ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपुढे महाराष्ट्र आहे. उर्वरित देश महाराष्ट्रापुढे आहे. दोषसिद्धीदर वाढविण्याची जबाबदारी ही जितकी पोलिसांची आहे तितकीच सरकारी वकिलांचीही आहे. गुन्ह्याचा अचूक तपास, भक्कम पुरावे गोळा करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. तर पोलिसांनी गोळा केलेले पुरावे न्यायालयात अचूकपणे मांडणे हे वकिलांचे. यापैकी एकही बाजू कमी पडल्यास त्याचा थेट परिणाम दोषसिद्धीवर होतो, असे निरीक्षण राज्याचे महासंचालकसंजीव दयाळ वेळोवेळी मांडतात. तर प्रलंबित खटले वेगाने निकाली काढण्यासाठी न्यायालये व न्यायाधीशांची संख्या वाढवायला हवी. (प्रतिनिधी)विशेष न्यायालये स्थापन करावीतमहिला, अल्पवयीन मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्याविरोधातील गुन्ह्यांचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करायला हवीत. प्रलंबित खटल्यांचा अभ्यास करून ते ठरावीक कालमर्यादेत निकाली निघावेत यासाठी कार्यक्रम आखावा. किरकोळ गुन्ह्यांच्या खटल्यात तत्थ्य नसल्यास अथवा साक्षीदार, पंच उपलब्ध नसल्यास ते तत्काळ निकाली काढण्यासाठी सरकारी पक्षाने पुढाकार घ्यावा, असे मत अभिनंदन वग्याणी यांनी व्यक्त केले.