यदु जोशी, नवी दिल्ली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आपल्या अत्यंत विश्वासू आनंदीबेन पटेल यांना संधी देताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्यांचे नाव सुचविले त्या अमित शहा यांना डावलले, अशी माहिती समोर येत आहे. आनंदीबेन आणि शहा हे गुजरातच्या राजकारणात मोदी यांचे डावे-उजवे समजले जातात. दोघांचे विधानसभा मतदारसंघ एकमेकांना लागूनच आहेत पण पटेल व शहा यांच्यात फारसे सख्य नाही. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये दणदणीत विजयाचे मोठे श्रेय शहा यांना दिले जाते. त्यामुळे त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचे बक्षीस दिले जाईल, असे म्हटले जात होते. मात्र मोदी यांनी रा.स्व.संघाचे मत बाजूला ठेवून आनंदीबेन यांना कौल दिला. दिल्लीतील अत्यंत विश्वासू राजकीय सूत्रांनूसार, मुख्यमंत्रीपद शहा यांना द्यावे, अशी रा.स्व.संघाची सूचना होती. हा निरोप नितीन गडकरींनी मोदींना पोहोचताही केला होता. या पार्श्वभूमीवर भविष्यात मोदी संघाचे किती ऐकतील, हा प्रश्नच आहे.
आनंदीबेन यांना संधी देऊन मोदींचा संघाला धक्का!
By admin | Updated: May 22, 2014 04:48 IST