शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

लाखमोलाची ‘लाख’!

By admin | Updated: May 22, 2014 22:29 IST

दागिणे निर्मितीपासून ते स्फोटकांच्या सुरक्षेपर्यंत नानाविध उपयोग

अकोला: सोन्याच्या दागिण्यांपासून स्फोटकांच्या सुरक्षेपर्यंत नानाविध उपयोग असलेल्या आणि त्यामुळे ह्यलाखमोलाची लाखह्ण असे वर्णन केल्या जाणार्‍या लाखेचे उत्पादन आता विदर्भातील शेतकरीही घेऊ लागला आहे. लाखेच्या जागतिक बाजारपेठेवर भारताचा कब्जा आहे. आता विदर्भातील शेतकरीही लाखचे उत्पादन घेऊ लागले असून, त्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन घेता यावे, याकरीता कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आठ हजार शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिल्या जात आहे. लाखेच्या अल्प खर्चाच्या शेतीमुळे विदर्भातील गोंदिया जिल्हयात सुमारे ४0 ते ५0 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. लाखेच्या शेतीमुळे मुख्यत्वे आदिवासी भागातील शेतकर्‍यांना रोजगार मिळाला आहे. लाखेचे उत्पादन घेण्यात भारत जगात आघाडीवर असून, विदर्भातील गोंदिया, गडचिरोली व इतर काही भागांमध्ये पळस, बोर व कुसूम या वृक्षांवर लाखेचे उत्पादन घेतले जात आहे. उत्पादनात अधिक वाढ व्हावी, यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी लाख उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. एका झाडापासून जवळपास ७00 ते ८00 रू पयांचे उत्पादन मिळते, तर खर्च १00 रुपयांपेक्षाही कमी आहे. एक किलोग्रॅम लाख बाजारात ४00 ते ५00 रू पयांना विकल्या जाते. पळस, बोर, कूसूम अशा फारसा इतर उपयोग नसलेल्या वृक्षांवर लाख उत्पादन घेतले जात असल्यामुळे, या शेतीसाठी कोणतीही मोठी गुंतवणूक करावी लागत नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.

** सहा महिन्यात ४५ किलोचे उत्पादन

पूर्व विदर्भातील गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात, निसर्गत: वाढलेले पळस व कुसूम वृक्ष मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. कुसूम (स्लेईचेरा ओलिओसा) किंवा कोसम हा सॅपीनडेसी या कुळातील वृक्ष असून, ह्यलाखवृक्षह्ण म्हणूनच ओळखला जातो. मोह या वृक्षासारखाच हा वृक्ष आकाराने मोठा असतो. या वृक्षावर उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये लाखेचे उत्पादन घेता येते.

** किडींची निर्मिती

लाख कीड आकाराने सुक्ष्म असून, उपजिविकेसाठी ती कुसूम, बोर, पळस आदी वृक्षांचे रसशोषण करते आणि स्वसरंक्षणासाठी तोंडातून लाळ सोडून स्वत:भोवती आवरण तयार करते. त्या आवरणालाच लाख म्हणतात. लाख वाळल्यावर ती वृक्षावरू न काढली जाते

**लाखेचा उपयोग

सोन्याचे दागिणे बनविण्यासाठी लाखेचा उपयोग मोठय़ा प्रमाणात केल्या जातो. लष्कराद्वारा वापरल्या जाणार्‍या स्फोटकांना अति तापमानापासून वाचविण्यासाठीही लाख वापरली जाते. महत्वाचे दस्तावेज सिलबंद करण्यासाठीही लाखेचा वापर करतात. त्याशिवाय वाहन उद्योग, विजेचे दिवे, तसेच सर्वच प्रकारच्या चॉकलेटच्या आवरणांसाठीही लाखेचा वापर होतो. लाख अशी विविधोपयोगी आहे.

** एक वर्षात साडेतीन लाखाचे उत्पादन!

गोदींया जिल्हयातील शेतकरी गणेश तिल्लारे यांनी लाख शेतीतून गतवर्षी साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळविले असल्याचे, त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. यंदा मात्र भाव पडले असल्यांची खंतही त्यांनी व्यक्त केली. .