ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:28 IST2026-01-22T12:26:12+5:302026-01-22T12:28:17+5:30

OBC Reservation Mayor Municipal List: महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आरक्षण २०२६: जळगाव आणि चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महापौर. कोल्हापूर, पनवेल, अकोल्यात ओबीसी आरक्षण जाहीर.

Mayor OBC Reservation: Mayoral reservation for OBCs announced! OBC mayors now in 'these' cities including Ichalkaranji, Jalgaon, Kolhapur; See full list | ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी

ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाचे आरक्षण आज निश्चित झाले. यामध्ये इचलकरंजी, पनवेल, अकोला आणि अहिल्यानगर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आता ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) समाजाचा महापौर विराजमान होणार आहे. तर जळगाव आणि चंद्रपूरमध्ये या प्रवर्गातील महिलांना संधी मिळणार आहे.

ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी आरक्षित शहरे:
१. इचलकरंजी: ओबीसी (सर्वसाधारण) २. पनवेल: ओबीसी (सर्वसाधारण) ३. अहिल्यानगर (अहमदनगर): ओबीसी (महिला) ४. अकोला: ओबीसी (महिला) ५. कोल्हापूर: ओबीसी (सर्वसाधारण) ६. उल्हासनगर: ओबीसी (सर्वसाधारण) ७. जळगाव: ओबीसी (महिला) ८. चंद्रपूर: ओबीसी (महिला)

राजकीय गणितांवर होणारा परिणाम:
कोल्हापूर आणि इचलकरंजी: पश्चिम महाराष्ट्रातील या दोन शहरात ओबीसी आरक्षण पडल्याने स्थानिक पातळीवरील दिग्गज नेत्यांची समीकरणे बदलली आहेत. आता या प्रवर्गातील सक्षम चेहऱ्यांची पक्षांकडून शोधाशोध सुरू होईल.

जळगाव आणि चंद्रपूर: या दोन्ही ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण असल्याने महिला राज पाहायला मिळणार आहे. विशेषतः जळगावात भाजप आणि शिवसेनेमध्ये या पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळू शकते.

अहिल्यानगर: नामांतरानंतर अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक होत असून, ओबीसी आरक्षणामुळे नव्या दमाच्या नेत्यांना संधी मिळणार आहे.

Web Title : ओबीसी महापौर आरक्षण घोषित: प्रमुख शहरों में ओबीसी महापौर होंगे

Web Summary : 29 नगर निगमों के लिए महापौर आरक्षण तय हुआ। इचलकरंजी, पनवेल और कोल्हापुर में ओबीसी महापौर होंगे। जलगांव और चंद्रपुर ओबीसी महिलाओं के लिए आरक्षित हैं। इससे राजनीतिक समीकरण बदलेंगे, खासकर पश्चिमी महाराष्ट्र में।

Web Title : OBC Mayor Reservation Lottery Announced: Key Cities Get OBC Mayors

Web Summary : Mayoral reservations are set for 29 municipal corporations. Ichalkaranji, Panvel, and Kolhapur will have OBC mayors. Jalgaon and Chandrapur are reserved for OBC women. This reshapes political dynamics, especially in western Maharashtra.