शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

माओवाद्यांनी पळविल्या वनकर्मचाऱ्यांच्या बंदुका

By admin | Updated: December 21, 2014 00:59 IST

जंगलात गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांजवळील तीन एसएलआर बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळविल्या. ही घटना शनिवारी दुपारी अहेरी तालुक्यातील कोंजेड येथे घडली.

पोलीस यंत्रणा हादरली : अहेरी तालुक्यातील कोंजेड येथील घटनागडचिरोली : जंगलात गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांजवळील तीन एसएलआर बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळविल्या. ही घटना शनिवारी दुपारी अहेरी तालुक्यातील कोंजेड येथे घडली. या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला असून रात्री उशिरा जिमलगट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिरोंचा वनक्षेत्रात येणाऱ्या देचलीपेठा वनपरिसरातील कोंजेड येथे शनिवारी वनविभागाचे कर्मचारी लाकूड तस्करांच्या मागावर होते. दरम्यान कोंजेड जंगलात लपून बसलेल्या माओवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांंच्या ताब्यातील तीन बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे पळविली. त्यानंतर हे कर्मचारी पायीच जंगलातून सायंकाळी उशिरा जिमलगट्टा येथे पोहोचले. त्यानंतर ते जिमलगट्टा पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविण्यात आला.महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या गोदावरी नदीपात्रातून सागवान लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. या तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने वनविभागाला शस्त्रे पुरविली होती. लाकडे वाहून नेताना कुणी दिसत असेल व अडवूनही थांबत नसेल तर थेट शस्त्राचा वापर करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी पोलीस प्रशासनाच्या मदतीने तस्करांवर नजर ठेवून आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)पोलिसांनी केले होते अलर्टगस्तीवर जाण्यापूर्वी वनकर्मचाऱ्यांना शस्त्रे पोलीस ठाण्यातून न्यावी लागतात. त्यामुळे आज दुपारला कोंजेड जंगलात तस्कर असल्याची माहिती मिळताच वनकर्मचारी बंदुका घेण्यासाठी जिमलगट्टा पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी कोंजेड जंगलात माओवादी असल्याचे पोलिसांनी सांगून वनकर्मचाऱ्यांना अलर्ट केले होते. परंतु, वनकर्मचारी धाडसाने जंगलात गेले आणि शस्त्रे गमावून बसले.