पालघर : पालघर जिल्ह्यातून वैतरणा, सूर्या, पिंजाळ, देहर्जे, दमनगंगा, तानसा इत्यादी नदयांवर बांधण्यात आलेले अनेक पूल हे ब्रिटिश कालीन तसेच राज्याच्या सार्वजनिक व जिल्हा परिषदांच्या बांधकाम विभागा मार्फत अनेक वर्षांपूर्वी बांधलेले आहेत. हे सर्व पूल ऊन, वारा, पाऊस आणि बारमाही वाहणाऱ्या पाण्यामुळे झिजले असून काही अनधिकृत रेती उत्खननामुळे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. त्याची देखभाल, दुरुस्ती व नव्याने उभारणी वेळीच न झाल्यास महाडच्या सावित्री प्रमाणेच जिल्ह्यात जीवितहानीच्या घटना घडू शकतात.पालघर जिल्ह्यातील वाडा येथील पिंजाळ, वैतरणा व तानसा नदयांवर ब्रिटिशकालीन पूल असून ते जीर्ण अवस्थेत आहेत. पनवेल व्हाया भिंवडी, वाडा, मनोर, अहमदाबाद बायपास चौपदरी महामार्गावरील वाहतूक याच पुलांवरून जात असून गेले पाच वर्षे या नवीन रस्त्याचे काम सुरु आहे मात्र हे पुल तोडून नवीन बांधण्याचे काम करण्यांत आलेले नाही, त्यामुळे मोठया अपघाताची शक्यता आहे. पालघर तालुक्यातील सफाळे मार्गे मुंबई व गुजरात राज्यात जाण्यासाठी वैतरणा नदीवर पारगाव येथे १९७८ च्यादरम्यान बांधण्यात आलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. या पुला जवळील निषिद्ध क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन होत असल्याने पुलाचा एक पिलर खचून एका बाजूला कलंडला आहे. त्याची दुरुस्ती दीड वर्षे झाली तरीही अद्यापही करण्यांत आली नाही, मात्र रेती उपसा बेकायदेशीररित्या आजही जोमाने सुरु आहे. या कडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यंत्रणा एखाद्या दुर्देवी घटनेची वाट पाहत आहे काय? असा प्रश्न स्थानिक विचारू लागले आहेत.सूर्या नदीवर गुंदले व नागझरी दरम्यानच्या बोईसर एम. आय.डी. सी.कडे जाणार पूल १९६२ दरम्यान बांधण्यात आला असून कमी वजन पेलण्याची क्षमता असलेल्या या पुलावरून सध्या २०० टनाहून अधिक अवजड क्षमतेच्या वजनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे हा पुल खिळखीळा झाला असून अनेक वाहनांच्या धडका या पुलाला बसल्याने पुलावरून जाताना हादरे बसल्याचे जाणवते आहे. तर पालघर बोईसर राज्य महामार्गावरील सरावली येथे पाच सहा वर्षांपूर्वी बांधकाम विभागाने बांधलेल्या या पुलाचे सांधे उखडले असून त्यामुळे पुलाच्या स्टील मध्ये पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे पूल दिवसे दिवस कमकुवत होत आहे,वैतरणा व सफाळे रेल्वे स्थानका दरम्यान वैतरणा खाडीवर असलेला रेल्वे पूल धोकादायक बनलेला आहे. या पुलाखाली खाडीतून बेकायदेशीर रित्या काही स्थानिक वाळू उपसा करीत असल्याने त्याला धोका निर्माण झालेला आहे. पुलाचा पाया कमकुवत झाला असून तो कोसळण्याची भीती आहे. तर काल कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्वेकडील पुला जवळील भराव वाहून गेला आहे. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर वैतरणा पुलाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मुंबई आणि गुजरात, दिल्ली ई. भागात मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा सुरु असल्याने एखादी ट्रेनला अपघात घडल्यास सावित्री पेक्षा मोठ्या जीवितहानीला सर्वाना सामोरे जाण्याची दुर्दैवी वेळ येऊ शकते.मागील अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरू असल्याने पुलाचा पाया कमकुवत झाला आहे. याबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांनी रेल्वे आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु वाळूमाफियांवर महसूल, पोलीस विभागाला नियंत्रण मिळवता आलेले नाही. दीड वर्षांपूर्वी या पुलाची संरक्षक भिंत खचल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. विक्रमगड तालुक्यातील काशिवली पूलांची अवस्थाही काहीशी जीर्ण झाली असून त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात त्यावरून पाणी वहात असते. त्याला संरक्षक भिंत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)>विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रवास धोक्याचा बनला आहेकशिवली गावाजवळ असलेला हा पूलफार जुना असून, कमी उंचीचा आहे. तीनखांबांवर हा पूल उभा आहे. या पुलावरचा रस्ताखराब झाला असून त्याला खड्डे पडले आहेत. यामुळे येथे वाहने वारंवार पंक्चर होत आहेत. या पुलाच्या बाजूचे कठडे तुटल्याने वाहनचालकास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या पुलावरून विक्र मगड, वाडा येथे जाण्याचा मार्ग जवळ असल्याने कशिवली, माले, कावळा या गावांतील नागरिक या पुलाचा वापर करीत असतात. परिणामी या पुलावरन जाणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे यापुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशीविद्यार्थ्यांसह, नागरिकांची मागणी आहे.>साखरे पुलाचे भूमिपूजन करूनही कामाला मुहूर्त सापडत नाहीजव्हार- विक्र मगड तालुक्यांतील ब्रिटिश कालीन पुल सर्वात धोका दायक आहे. कधीही कोसळून पडू शकतो. आशा अवस्थेत आहे. सर्व पुलाचे पिलर खचु लागले आहेत. हां पुल पाडून या जागी नविन पुल बांधण्यात येणार आहे. या नविन पुलाचे उदघाटन गेल्या वर्षी मोठया धूम धड्याक्यात पालकमंत्री विष्णु सावरा यांचा हस्ते करण्यात आले मात्र उदघाटन करु न एक वर्ष उलटून ही आद्यप ही या पुलाचा कामाला मुहूर्त मिळत नाही. एखादा मोठा आपघात झाल्यावर उशीराचे शहानपण सरकारी यंत्रणेला येईल का असे येथील नागरिक प्रश्न विचारत आहेत.जिल्ह्यातील सर्वच पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट होन गरजेचे असून वेळीच दूरु सत देखील होणे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिक मार्फत करण्यांत येत आहे.
पालघर जिल्ह्यात अनेक पूल धोकादायक
By admin | Updated: August 5, 2016 02:43 IST