शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पराभवाचे मुंबईत मंथन

By admin | Updated: May 23, 2014 00:11 IST

बुथ कमिट्यांच्या नियोजनाचा अभाव; योजना लोकांपर्यंत न पोहोचणे भोवले

अकोला: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर गुरुवारी मुंबई येथे पार पडलेल्या समीक्षा बैठकीत प्राथमिक स्तरावर चिंतन करण्यात आले. बुथ कमिट्यांच्या नियोजनाचा अभाव आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत न पोहोचल्याने पराभव झाल्याचा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र बैठकीत पराभवाचे सखोल विश्लेषण करण्यात आले नसून, लवकरच प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्‘ात बैठक घेण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. जिल्‘ातील कॉँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून स्वत:चे दामटलेले घोडे, नियोजनाचा अभाव आदींमुळे लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा पराभव झाला. कॉँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले. भाजपचे उमेदवार खा. संजय धोत्रे हे २ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. या पराभवाचे विश्लेषण करून वर्षअखेर होणार्‍या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मुंबईत गुरुवारी पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाला जनतेने का नाकारले, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाने सर्वच स्तरातील आणि प्रत्येक समाज घटकासाठी योजना तयार केल्या. नागरिकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी कायदेही केले. मात्र हे निर्णय आणि योजना जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. तसेच या योजना लोकाभिमुख आहेत, हेही नागरिकांना पटवून देण्यात नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपयश आले. जिल्‘ात बुथ कमिट्यांचे नियोजन करण्यास विलंब झाला. सर्वच पदाधिकारी आणि नेत्यांनी विजयासाठी सांघिक प्रयत्न केले नाहीत. या सर्व कारणांमुळे पक्षाचा पराभव झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. समीक्षा बैठकीत जिल्‘ातील पदाधिकार्‍यांनी सूचनाही केल्या. बैठक प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैेठकीला अकोल्यातून जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आ. लक्ष्मणराव तायडे, सुधाकरराव गणगणे, नातिकोद्दिन खतीब, महानगराध्यक्ष मदन भरगड, बबनराव चौधरी, वाशिमचे दिलीप सरनाईक, डॉ. झिशान हुसेन, बद्रुजमा, आ. अमित झनक, नगरसेवक साजिद खान पठाण, प्रकाश तायडे, डॉ. सुभाषचंद्र कोरपे आदी उपस्थित होते. ** विधानसभेसाठी तयारीला लागण्याच्या सूचना....यंदा होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना प्रदेश पातळीवरून देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने जिल्‘ातील रखडलेले प्रकल्प, योजना व प्रश्नांचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये विमानतळ विस्तारीकरण, एलबीटीचा समावेश राहणार आहे. हे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.