शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

मंडल अधिकारी घेणार पावसाची नोंद

By admin | Updated: June 8, 2016 02:15 IST

जून महिना उजाडताच महसूल विभागाच्या मंडल अधिकारी व तलाठीवर्गाला पर्जन्यमानाची नोंदी करण्याचे रजिस्टर अपडेट करावे लागते

पेण : मान्सूनच्या आगमनाची ७ जून ही तारीख गृहीत धरून जून महिना उजाडताच महसूल विभागाच्या मंडल अधिकारी व तलाठीवर्गाला पर्जन्यमानाची नोंदी करण्याचे रजिस्टर अपडेट करावे लागते. मात्र ७ जून उजाडून देखील मान्सून हजर न झाल्याने १ जूनपासून पावसाच्या घेण्यात येणाऱ्या नोंदीचे रजिस्टर कोरेच राहिले आहे. तरीही मान्सूनची जोशात होणारी एण्ट्री लक्षात घेवून रायगड जिल्ह्यातील ६० महसूल मंडल कार्यालयात पर्जन्यमान अचूकतेने नोंदी करण्याचे आदेशच कृषी आयुक्त, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्रामार्फत महसूल विभागाला देण्यात आले आहेत. प्रत्येक मंडल, विभागीय क्षेत्रातील पर्जन्यमापके बसवून ती अपडेट करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.आयुक्त कृषी विभाग व राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र यांच्यामार्फत पर्जन्यमापन करण्याचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. राज्यभरातील महसूल विभागाच्या सर्व मंडलामध्ये पडलेल्या पावसाची नोंद ेंँं१ं्रल्ल.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर टाकण्यात येणार असून याद्वारे सबंध जगाच्या पाठीवर याद्वारे भारतीय माणसाला आपल्या राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व जन्मगावी किती पाऊस पडला याची अपडेट माहिती मिळणार आहे. या मान्सून कालावधीत मंडल अधिकारी व तलाठी यांनी दैनंदिन पडणारा पाऊस व त्याच्या नोंदी कशा कराव्यात आणि घेतलेली नोंद एसएमएसद्वारे आयुक्त कृषी व राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राकडे कशी पाठवायची याचे प्रशिक्षणही संबंधितांना देण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वा. अशा २४ तासांच्या कालावधीत पडलेला पाऊस, किती मि.मी. पडला अशी नोंद मंडल अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. दरवर्षी १ जूनपासून हा अहवाल महसूल विभाग घेत असतो. वर्षभराच्या कालावधीतील पावसाची नोंद महत्त्वपूर्ण ठरते. दैनंदिन पावसाची नोंद व हवामानशास्त्र अंदाज यावरून मान्सून आपत्तीपूर्व सुरक्षा प्रतिबंध उपाययोजना करता येतात. यामुळे आपत्तीजनक नैसर्गिक घटनांवर वेळीच मार्गदर्शन व उपाययोजना करणे शासनास शक्य होणार आहे. (वार्ताहर)>१० मंडल कार्यालयांमार्फत पर्जन्यमान नोंदपेण शहरासह १० मंडल कार्यालयामार्फत पर्जन्यमान नोंदले जाते. मात्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आजपर्यंतची चोख कामगिरी, तहसील, पंचायत समिती, नगरपरिषद यांच्याबरोबरीने ६३ ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहकार्यामुळे पेणमध्ये आपत्ती काळात सर्वच यंत्रणा सचेत राहतात, ही समाधानाची बाब आहे. आपत्ती प्रसंगी होणार मदत : रायगडात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस धोकादायक पडतो. ४०० ते ६०० मि.मी. दरम्यान पाऊस पडला तर पूरसदृश परिस्थिती उद्भवून नद्यांची प्रवाह पातळी धोकादायक बनते. अशा वेळेस या माहिती प्रसारण संदेशवहन यंत्रणामुळे नागरिकांना अचूक माहिती मिळण्यास ही यंत्रणा कार्यक्षम ठरते. पेण शहरासह ग्रामीण परिसराला भोगावती, बाळगंगा व पाताळगंगा या तीन नद्यांच्या प्रवाहाचा धोका आहे. त्याचबरोबर आंबेघर, शहापाडा, हेटवणे या तीन धरणांचा पूर परिस्थितीत सांडव्याद्वारे विसर्ग होणारे पाणी या बाबीमुळे तत्काळ पूरपरिस्थिती उद्भवते. उपाय योजना करणे शक्य होणार : माहिती प्रसारण युगाच्या काळात या पर्जन्यमापक यंत्र व एसएमएस प्रणालीकडे राज्यात कुठेही किती पाऊस होईल, त्या संबंधीचे रेड अलर्ट व प्रसंगानुरुप उद्भवणारी आपत्तीजनक नैसर्गिक घटनांवर वेळीच मार्गदर्शन व उपाययोजना करणे शासनास शक्य होणार आहे. त्यामुळे अपत्तीच्या काळात नागरिकांना याचा उपयोग निश्चित होणार असून शेतकऱ्यांनाही पाऊसाचा अंदाज मिळणार आहे.