मुंबई : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यात वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर पाणी वाचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, अभियानाच्या तिसऱ्या आठवड्याच्या उंबरठ्यावर असतानाच संपूर्ण महाराष्ट्र पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी सरसावला असल्याचे चित्र दिसत आहे.पावसाळ्यात जमिनीत मुरलेले तसेच खडकांतून पाझरणारे पाणी तळघरात एकत्र करून ते आंघोळीपासून कपडे धुण्यापर्यंत व स्वच्छतागृहापासून ते कुंड्यांतील झाडांना घालून टेरेसवर बगिचा फुलविण्याचा अनोखा प्रयोग राजारामपुरीतील बकरे कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, या पाणीबचतीचा संदेश परिसरातील सुमारे पाच-सहा कुटुंबीयांनीही घेऊन त्यांनीही पाणीबचतीचा मार्ग अवलंबला आहे. व्यवसायाने आर्किटेक्चर असलेले मोहन गोविंद बकरे त्यांचे भाऊ आर्टिस्ट विलास बकरे व नंदकुमार बकरे यांनी पाणीबचतीचा संदेश परिसरातही पोहोचविण्याचे काम कृतीतून केले आहे. पावसाच्या पूर्ण हंगामात कसाबसा एक ते सव्वा इंच पाऊस होणाऱ्या हातकणंगले तालुक्यात कोल्हापुरातील शेतकरी बाळासाहेब कारदगे यांनी ५० एकरातील आंब्याची दोन हजार झाडे जगविली आहेत. यासाठी त्यांनी पर्जन्य जलसंचयाद्वारे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) स्वयंपूर्णता साधली आहे. मौजे तासगाव-हेर्ले सीमेवर ५० एकर कोरडवाहू जमिनीवर पाच वर्षांपूर्वी आंब्याची दोन हजार झाडे लावली. त्यांना पाणी देण्यासाठी त्यांनी या परिसरात ३ कूपनलिका आणि विहीर खोदली. पाणीटंचाईच्या स्थितीत झाडे जगविण्यासाठी त्यांच्या मुळावर ज्यूटच्या पोत्यांचे आवरण घालणे, असे प्रयत्न त्यांनी केले. पण, पाण्यासाठी ठोस पर्याय असावा, या उद्देशाने त्यांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्याचे ठरविले. यानुसार त्यांनी त्यांच्या जमिनीच्या परिसरात असलेल्या कूपनलिका आणि कृषी विभागाने बांधलेला बंधारा या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले. (प्रतिनिधी)घरातील सिंक अथवा बेसिनमध्ये मुख्यत्वे कप-बशा विसळणे, भाजी धुणे अशी कामे केली जातात. बेसिनचा पाइप थेट ड्रेनेजच्या मुख्य पायपाला जोडलेला असतो. तो ड्रेनेजला न जोडता हे पाणी बादलीत साठवून त्याचा वापर बागांसाठी करू शकता.कपडे धुणे झाल्यावर राहिलेल्या साबणाच्या पाण्याचा वापर टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो.पाणीबचत : घरासमोर सडा टाकणे पूर्णपणे थांबवावे.पाणी वाचविणे ही काळाची गरज आहे, हे जगजाहीर आहे. भविष्यात पाण्यावरून तिसरे महायुद्ध होण्याची भीती आहे. त्यामुळे आपण जितकी पाणीबचत करू, तितका पाण्याचा सन्मान होईल. आपण इतर देवांची मंदिरे उभारतो, आता जलदेवतेचे मंदिर उभे करण्याची गरज आहे. मी स्वत: घरी जलबचतीचा प्रयोग राबवीत असून, दिवसभरातील सर्व कामे एक बादली पाण्यातच करण्याचा निर्धार केला आहे. आठ दिवसांपासून मी हा शिरस्ता पाळतो आहे. - चिन्मय उदगीरकर, अभिनेते
पाणी वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरसावला
By admin | Updated: May 22, 2016 03:27 IST