Maharashtra News Updates: विलिनीकरणाबद्दल अजित पवारांनी काय सांगितलं होतं? छगन भुजबळांनी केला नवीन खुलासा
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 21:28 IST2026-02-02T08:43:45+5:302026-02-02T21:28:12+5:30
Latest India Maharashtra News Updates in Marathi: देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातही ...

Maharashtra News Updates: विलिनीकरणाबद्दल अजित पवारांनी काय सांगितलं होतं? छगन भुजबळांनी केला नवीन खुलासा
Latest India Maharashtra News Updates in Marathi: देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातही दावे प्रतिदावे, टीका टिप्पणी सुरू आहे. विशेषतः राष्ट्रवादीचे विलीनीकरण या विषयावरून मतमतांतरे आणि तर्कवितर्क सुरू आहेत. मुंबईच्या महापौराची निवड हाही चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारानेही जोर धरला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात एपस्टीन फाईल्सने खळबळ उडवली आहे. या आणि इतर सर्व घडामोडींचे Live Updates...
LIVE
02 Feb, 26 : 08:52 PM
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला...! ऐन उड्डाणाआधीच रोखली गेलं विमान
एअर इंडियाच्या बोइंग ७८७-८ विमानात पुन्हा एकदा मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. लंडनहून बंगळुरूला येणाऱ्या विमानातील 'फ्यूल कंट्रोल स्विच'मध्ये बिघाड झाल्यचे सोमवारी निदर्शनास आले. ज्यामुळे उड्डाण रोखण्यात आले. याची गांभीर्याने दखल घेत, नागरी विमानवाहतूक संचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या ताफ्यातील सर्व विमानांचे फ्यूल स्विचची तपासण्याचे निर्देश दिले होते. यानंतर, खबरदारी म्हणून सर्व विमानांची तपासणी करण्यात आली असून इतर कोणत्याही विमानात बिघाड आढळून आला नाही, असे एअर इंडियाने स्पष्ट केले.
02 Feb, 26 : 08:37 PM
"...अशा प्रकारचं ठरलेलं होतं, हे मला अजित पवार यांनी सांगितलं होतं", छगन भुजबळांचं विधान काय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पक्षाचे विलिनीकरण करण्याबद्दल छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना नवीन खुलासा केला.
छगन भुजबळ म्हणाले की, "आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने माहिती सांगतोय, त्याला पुरावा काय? हे काही माहिती नाही. मला फक्त एवढं माहिती होतं की, बारामतीमध्ये कृषि प्रदर्शन होतं. त्यावेळी सर्व मंडळी तिथे एकत्रित आली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, त्या एकत्रित लढाव्यात, अशा प्रकारे ठरलेलं होतं. हे मला अजित पवारांनी सांगितलं होतं. त्या पलिकडे काहीही ठरलं नाही", असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला.
02 Feb, 26 : 08:18 PM
"जे महापौर देतील, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ", उद्धवसेना भाजपासोबत जाण्याची शक्यता
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा अंतर्गत तिढा संपतच नसल्याने उद्धवसेना भाजपासोबत जाण्याची शक्यता वाढली आहे. उद्धवसेनेचे नेतेही तशाच पद्धतीने भूमिका मांडताना दिसत आहेत.
उद्धवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिरी म्हणाले की, "भाजपाचे आमदार किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. जे महापौर पद देतील, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ", अशी भूमिका उद्धवसेनेने घेतली आहे.
02 Feb, 26 : 07:27 PM
Video अजित पवारांच्या अस्थींचे मुंबईतील बाणगंगामध्ये विसर्जन
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचा विमान कोसळून मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अस्थी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतही त्यांच्या अस्थींचे बाणगंगा येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
#WATCH महाराष्ट्र: महाराष्ट्र के पूर्व उपमुख्यमंत्री अजित पवार की अस्थियां मुंबई के बाणगंगा में विसर्जित की गईं। इस मौके पर NCP के कई नेता मौजूद थे। pic.twitter.com/07jkA2aglS
— ANI_HindiNews (@AHindinews) February 2, 2026
02 Feb, 26 : 07:15 PM
अजित पवारांचा अपघाती मृत्यू, संजय राऊतांनी राज्यसभेत मुद्दा मांडला
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला.
"१५ जानेवारी रोजी अजित पवारांनी म्हटले होते की, सिंचन घोटाळ्यात भाजपाने मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले. भाजपाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे. त्यानंतर १० दिवसांमध्येच विमान दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू होता. त्यासंदर्भातील फाईल ते कायम स्वतःसोबत ठेवायचे. बारामतीला जातानाही ती फाईल त्यांच्यासोबत होती. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. अजित पवारांचा अपघात बघून मला न्यायमूर्ती लोयांची आठवण झाली आहे", असा गंभीर आरोप संजय राऊतांनी राज्यसभेत केला.
02 Feb, 26 : 06:36 PM
"एवढा अहंकारी आणि खोटारडा निवडणूक आयोग बघितला नाही" - ममता बॅनर्जी
निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या, "आपण अतिशय दुःखी आहोत. प्रदीर्घ काळ दिल्लीच्या राजकारणात राहिलो आहोत. चार वेळा मंत्री आणि सात वेळा खासदार राहिलो आहोत. मात्र, आजवर एवढा अहंकारी आणि खोटारडा निवडणूक आयोग बघितला नाही." एवढेच नाही तर, केवळ बंगाललाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न करत, ९८ लाख लोकांची नावे मतदार यादीतून परस्पर हटवल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
02 Feb, 26 : 06:07 PM
मासा मेला म्हणून सुतक पाळणारे लोकनेते कसे होतील? महाजनांची राज ठाकरेंवर टीका
"कुत्र्याला सर्दी झाली म्हणून दुष्काळी दौरा रद्द करणारे आणि घरातील मासा मेला म्हणून सुतक पाळणारे कधीही लोकनेते होऊ शकत नाही. मी दोन भाऊ एकत्र येण्यासाठी संघर्ष केला. ते एकत्र आले आणि मला बाहेर केले", अशी टीका शिंदेसेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली.
02 Feb, 26 : 05:32 PM
मुंबईतील लहान मुलांच्या अपहरणाची माहिती खोटी...
मुंबईत गेल्या ३६ तासांत ६ मुलं बेपत्ता झाल्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. पण ही माहिती खोटी असून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.
काही समाज माध्यम खात्यांद्वारे बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जात आहे. आम्ही या दाव्यांचे पूर्णपणे खंडन करतो.
— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) February 2, 2026
या संदर्भात मुद्दाम खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे (FIR) नोंदवण्यासह कठोर कायदेशीर कारवाई…
02 Feb, 26 : 05:25 PM
उल्हासनगरमध्ये टेम्पोच्या धडकेत ऍक्टिव्हा चालकाचा मृत्यू
कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील कालीमाता मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातात सतीश भिमराव खैरे या दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. टेम्पो चालकावर निष्काळजीपणे टेम्पो चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
02 Feb, 26 : 05:15 PM
आव्हाडांचं अजित पवारांसोबत शेवटचं संभाषण काय झालं होतं?
विलिनीकरणाचा पुढाकार तर अजित पवारांनी घेतला होता. त्यांचे आणि माझे शेवटचे संभाषण झाले, हे मी आतापर्यंत बोललो नाही. या विषयावर मला फार बोलायचे नाही. अजितदादा मला म्हणालेले जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव. सगळे व्यवस्थित होईल." जितेंद्र आव्हाड असेही म्हणाले की, "मला या चर्चेपासून मुद्दाम लांब राहायचे आहेत. त्यांना त्याची काय चर्चा करायची ती करू द्या."
02 Feb, 26 : 04:37 PM
प्रचंड गदारोळानंतर, लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब
लोकसभा तालिका अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले आहे. राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या पुस्तकाचा वारंवार उल्लेख केला, यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
02 Feb, 26 : 04:10 PM
लोकसभेत राहुल गांधी यांची जगदंबिका पाल यांच्याशी खडाजंगी
लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू, राहुल गांधी मत मांडण्यावर आडून बसले; जगदंबिका पाल यांच्याशी खडाजंगी. राहुल गांधी म्हणाले, हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा आहे.
02 Feb, 26 : 04:01 PM
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल, पार्थ पवारांचे नाव नाही
राज्यभरात गाजलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या नावांचा समावेश नाही. पार्थ पवारांचेच नाव या प्रकरणात आल्यामुळे हे प्रकरण गाजत होते, पण त्यांचेच नाव वगळण्यात आल्याने अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे.
१८८६ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुख्य आरोपी शीतल तेजवाणीवर वेगवेगळे आरोप करण्यात आलेले आहेत.
02 Feb, 26 : 03:36 PM
"आम्हीही अनुभवी, आम्हीही खूप काम केलंय", विलिनीकरणावर तटकरे स्पष्टच बोलले
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीका करणाऱ्यांना स्पष्टच सुनावले आहे.
"आम्ही स्वबळावर निवडणूक लढलो, जिंकलो. विलिनीकरणाबद्दल निर्णय चर्चा सुरू होईल तेव्हा होईल. आम्हीही दीर्घकाळ अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने घेतलेली भूमिका महाराष्ट्रात अंमलात आणण्यासाठी मेहनत घेतली आहे. आम्हीही दीर्घकाळ काम केले आहे. २०१४ साली मलाही शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष नेमलेले आहे. त्यामुळे आम्हीही अननुभवी आहोत असे नाही", असे सांगत त्यांनी तूर्तास विलिनीकरणाची चर्चा होणार नाही असेच संकेत दिले.
02 Feb, 26 : 03:05 PM
सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या कुटुंबीयांना दिला आधार, भेट घेत सांत्वन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विमानात अपघातात मृत्यू झालेले अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. विदीप जाधव यांची पत्नी आणि कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले.
आज राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे पीएसओ कै. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी मा. उपमुख्यमंत्र्यांनी कै. विदीप जाधव यांना आदरांजली अर्पण करत, जाधव कुटुंबीयांशी आत्मीय… pic.twitter.com/dO5mlgeC7A
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) February 2, 2026
02 Feb, 26 : 02:46 PM
अमित शाह, राजनाथ सिंहांनी राहुल गांधींना एकच प्रश्न विचारला; सभापतींनी नियमच सांगितला...
VIDEO | In Lok Sabha, Rahul Gandhi raises ex-army chief's memoirs to attack govt on China border issue, Amit Shah also says book has not been published and should not be raised; Speaker endorses govt view
— Press Trust of India (@PTI_News) February 2, 2026
(Source : Third Party) pic.twitter.com/Zl0Rex9hxZ
02 Feb, 26 : 02:39 PM
...अन् राहुल गांधींच्या या विधानावरून लोकसभेत गदारोळ सुरू झाला!
VIDEO | Parliament budget session: Lok Sabha LoP Rahul Gandhi speaks in Parliament, saying, “A young colleague made an allegation on the Congress party and our patriotism and understanding of Indian culture. I want to talk about it.”
— Press Trust of India (@PTI_News) February 2, 2026
(Source: Third Party) pic.twitter.com/jWIwkfxkyR
02 Feb, 26 : 02:29 PM
चीनच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज तहकूब
राहुल गांधी यांच्या डोकलाम संदर्भातील विधानावरून संसदेत गदारोळ. पुस्तकाचा दाखला देत, चीनचे रणगाडे भारताच्या हद्दीत आल्याचा दावा. केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न. मात्र, अप्रकाशित पुस्तकातील मजकूर सभागृहात वाचून दाखवता येणार नाही, सभापतींना सांगितला नियम. विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब.
02 Feb, 26 : 02:10 PM
जे चर्चेत नव्हते, त्यांना काय माहिती असणार? शरद पवारांनी सुनावले
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते विलिनीकरणाच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका मांडत आहेत. अशी चर्चा झाली नव्हती, जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र येण्याचीच चर्चा झाली होती, असे म्हटले गेले. त्यावर आता शरद पवार यांनी नाव न घेता काही नेत्यांना सुनावले आहे. "विलिनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार?" असा उलट सवाल करत त्यांच्या भूमिकांवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
02 Feb, 26 : 01:38 PM
पुरावा काय?; उज्ज्वल निकम यांचा नेमका प्रश्न
अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला, त्या विमानात सहा प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आतापर्यंत समोर आलेला नाही. अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा कट आहे, असं कुणी म्हणत असेल तर कायद्यानुसार तो सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्याची गरज आहे. त्यामुळे वेगवेगळे संशय व्यक्त करून आपण या प्रकरणाला निष्कारण वेगळी कलाटणी देत आहोत, असे माझे स्पष्ट मत आहे: ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम
02 Feb, 26 : 01:31 PM
मी सांगतोय ना, नाही म्हणजे नाही: राज ठाकरे
मुंबई महानगरपालिकेत मनसेचे नगरसेवक भाजपाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साफ खोडून काढली आहे. "आम्ही मुंबईत भाजपासोबत जाणार नाही. मी सांगतोय ना, नाही म्हणजे नाही", असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
02 Feb, 26 : 01:14 PM
कोल्हापूरचे महापौरपद भाजपाकडे, कोणत्या महिलेला मिळाली संधी?
कोल्हापूरम महापालिकेमध्ये भाजपा, शिंदेसेना एकत्र लढली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून कोल्हापूरचे महापौर पद आमच्या पक्षाला मिळावे, अशी मागणीही शिंदेसेनेच्या नेत्याकडून करण्यात आली होती. पण, भाजपाने महापौर पद सोडले नाही. कोल्हापूर महापौरपदासाठी रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. उपमहापौरपदी जनसुराज्यचे एकमेव नगरसेवक अक्षय जरग यांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
02 Feb, 26 : 12:34 PM
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पार्थ पवार का नव्हते?
सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा पार्थ पवार बारामतीतच होते. ते शपथविधीला का आले नाही, यावरून बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपाने त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं का, अशीही कुजबूज ऐकू येतेय. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, "पार्थ पवार हे अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून, बारामतीमध्ये अनेक व्यक्ती आपल्या संवेदना व्यक्त करण्यासाठी तिथं त्यांच्या भेटीस येत होत्या. त्या सांत्वनपर भेटी घेतल्यानंतर ते मुंबईत आले.
02 Feb, 26 : 12:26 PM
मुंबई मनपा: शिंदेंच्या शिवेसनेचा गटनेता ठरला...
मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची निवड करण्यात आली आहे. अमेय घोले हे मुंबईतील १७८ क्रमांकाच्या प्रभागातून निवडून आले आहेत. याशिवाय त्यांनी याआधी मुंबई मनपाच्या आरोग्य समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे.
02 Feb, 26 : 11:57 AM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कराडमध्ये प्रीतीसंगम येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहिली
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कराडमध्ये प्रीतीसंगम येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहिली. #Sunetrapawarpic.twitter.com/9Zt5tQH6Rd
— Lokmat (@lokmat) February 2, 2026
02 Feb, 26 : 11:51 AM
मुंबई मनपा गटनेता निवड: शिंदेंच्या नगरसेवकांची बैठक सुरू
मुंबई मनपात गटनेता निवड करण्यासाठी शिवसेनेची पालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात बैठक सुरू झाली आहे.
02 Feb, 26 : 11:48 AM
मुंबई मनपा: भाजपच्या गटनेता निवडीनंतर बैठक
मुंबई मनपासाठी भाजपच्या गटनेते पदी गणेश खणकर यांची नियुक्ती झाल्यानंतर सर्व नगरसेवकांची पालिका सभागृहात बैठक सुरू झाली आहे. या बैठकीनंतर भाजपचे सगळे नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनला रवाना होणार
02 Feb, 26 : 11:35 AM
नागपूरचा महापौर ६ फेब्रुवारीला ठरणार
नागपूरः भाजपाच्या नगरसेवकांची आज गटनोंदणी. ६ फेब्रुवारीला ठरणार महापौर, उपमहापौर.
02 Feb, 26 : 11:21 AM
मुंबईत भाजपाचा गटनेता ठरला
मुंबई महापालिकेत भाजपाच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड. निष्ठावंत आणि सक्रिय शिलेदाराकडे सोपवली जबाबदारी.
02 Feb, 26 : 11:03 AM
संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, मी त्या फाईल उघड करीन, असे अजित पवार यांनी १५ जानेवारी रोजी सांगितले होते. त्यानंतर पुढच्या १० दिवसांमध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. हे रहस्यमय आहे - शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना वेगळाच संशय
02 Feb, 26 : 11:00 AM
चांदीची घसरगुंडी, सोनंही घसरलं...
सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्स (MCX) वर आजच्या सुरुवातीच्या व्यवहारामध्ये चांदीच्या किमतीत सुमारे १६,००० रुपयांची घट झाली, तर सोन्याच्या किमतीतही ४,५०० रुपयांची घसरण झाली आहे. (वाचा संपूर्ण बातमी)
02 Feb, 26 : 10:49 AM
मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने ९ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकळल्या आहेत. त्या अनुक्रमे २४ फेब्रुवारी आणि २५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत.
02 Feb, 26 : 10:21 AM
मोबाईल, टीव्ही, AC स्वस्त होणार?
भारत सरकारने 'इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजने'अंतर्गत खर्चात मोठी वाढ केली आहे. या योजनेसाठीची तरतूद जवळपास २३ हजार कोटी रुपयांवरून वाढवून आता ४० हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. या भरघोस निधीमुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळेल आणि देशांतर्गत सप्लाय चेन अधिक मजबूत होईल. परदेशी कंपन्यांना भारतात त्यांचे युनिट्स उभारण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, फ्रीज आणि टोस्टर यांसारख्या घरगुती उत्पादनांच्या निर्मितीसाठी परदेशांवरील अवलंबित्व कमी होऊ शकतं. (वाचा संपूर्ण बातमी)
02 Feb, 26 : 10:02 AM
अजितदादा सत्ता सोडून गेले असते की...
राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही बैठका झाल्या होत्या. त्यात नेमका कोणता फॉर्म्युला ठरला होता किंवा कोणत्या पर्यायांवर चर्चा झाली? याबाबत संशयाचे दाट धुके तयार झाले आहे. विलीनीकरणानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे भाजपसोबत गेले असते की अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते, असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत. (वाचा संपूर्ण बातमी)
02 Feb, 26 : 09:36 AM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 'ऑन ड्युटी'
सुनेत्रा पवार आज कराड आणि फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर. कराडमध्ये प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहणार. त्यानंतर, विमान अपघातात मृत्यू झालेल्या विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन करणार.
VIDEO | Baramati: Maharashtra's Deputy Chief Minister Sunetra Pawar leaves from her residence in Sahyog Society.
— Press Trust of India (@PTI_News) February 2, 2026
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/OOhfmwjh4J
02 Feb, 26 : 09:30 AM
महायुती दोन गटांत नोंदणी करणार!
मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेच्या दृष्टीने महायुती आज दोन गटात नोंदणी करणार आहे. भाजपाचा स्वतंत्र गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाकडून एकत्र गटनोंदणी केली जाईल. त्यामुळे आता मुंबईच्या महापौरपदासाठी कुणाची निवड होते आणि कधी, याबद्दल उत्सुकता आहे.
02 Feb, 26 : 08:55 AM
मुंबई-पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत! अर्थमंत्र्यांकडून हायस्पीड रेल कॉरिडॉरची मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केली. हायस्पीड रेल्वेमुळे १७० किमीचा हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटात पूर्ण होणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. तसेच, पुणे-हैदराबाद हा ५५० किमीचा प्रवास केवळ १ तास ५५ मिनिटात होणार आहे.
