अमित शहांची पहिली सभा मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 11:37 AM2019-10-07T11:37:52+5:302019-10-07T11:41:14+5:30

Maharashtra Election 2019 लवकरच अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Maharashtra Election 2019 bjp president amit shah to take first rally in ausa for cm devendra fadnavis pa abhimanyu pawar | अमित शहांची पहिली सभा मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसासाठी

अमित शहांची पहिली सभा मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसासाठी

googlenewsNext

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता लवकरच नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. उद्या बीडमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याला भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. शहा विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचारसभा लातूरमधील औसा मतदारसंघात घेणार आहेत.

औसा मतदारसंघात भाजपाकडून अभिमन्यू पवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्र्यांचे पीए/ओएसडी असलेल्या पवार यांच्यासाठी शहा राज्यातील पहिली प्रचारसभा घेतील. औसात अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या आठवड्यात या नाराजीचं जाहीर दर्शन घडलं. बुधवारी (२ ऑक्टोबरला) भाजपाचे कार्यकर्ते लातूर-औसा रस्त्यावर आले होते. याच मार्गावरून निलंग्याकडे निघालेले पालकमंत्री संभाजी पाटील यांची गाडी त्यांनी अडवली. आम्हाला मुख्यमंत्र्यांचे पीए नको, तर भूमिपुत्राला उमेदवारी द्या, अशी मागणी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांकडून होत आहे.

शिवसेनेने १९९९ आणि २००४ साली औसामध्ये बाजी मारली होती. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यासाठी शिवसेना फारशी उत्सुक नव्हती. शिवसेनेला दोनदा मिळालेला विजय सोडल्यास बाकीच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं औसात वर्चस्व राखलं. सध्या काँग्रेसचे बसवराज पाटील औसाचं प्रतिनिधीत्व करतात. बसवराज पाटील यांनी २००९ मध्येही विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपकडून पाशा पटेल निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यांना पराभव पत्करला. त्यामुळे आता मुख्यमंत्र्याचे ओएसडी बाजी मारणार की बसवराज पाटील वर्चस्व राखणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Web Title: Maharashtra Election 2019 bjp president amit shah to take first rally in ausa for cm devendra fadnavis pa abhimanyu pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.