शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

इच्छुकांचा जीव लागला टांगणीला

By admin | Updated: August 2, 2016 01:51 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा नेत्यांनी काही महिन्यांपासून तळागाळातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे

रहाटणी : केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा नेत्यांनी काही महिन्यांपासून तळागाळातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, तर पालिकेत मागील तीन पंचवार्षिक सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, नेते यांनी काही झाले, तरी सत्तांतर होऊ न देण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे, तर शिवसेना व काँग्रेस आपापल्या परीने छुपे डावपेच आखताना दिसून येत आहेत. कोण कोणत्या पक्षात जाणार याचे अंदाज बांधले जात असले, तरी अनेकांना प्रभागरचनेची प्रतीक्षा असल्याचे आढळून येत आहे. अद्याप प्रभागाची रचना निश्चित न झाल्याने अनेक नगरसेवक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. अशा अनेक बाबींमुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. आगामी महापालिका निवडणुका चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यानुसार प्रभागात ४० ते ४५ हजार मतदार असतील. प्रभागाचे क्षेत्रफळ वाढणार आहे. प्रभागाला कोणता भाग जोडला जाईल, या विषयी अंदाज बांधले जात आहे. संभाव्य प्रभाग विचारात घेऊन काहींनी जनसंपर्काला सुरुवातही केली आहे.मात्र सध्याच्या प्रभागाची काय परिस्थिती होणार या चिंतेने सध्याचे नगरसेवक हैराण झाले आहेत. प्रभाग निश्चित न झाल्याने कोणतेही काम केले जात नाही किंवा कोणत्या मतदारापर्यंत जावे हेही न कळण्यापलीकडे झाल्याने विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवार कमालीचे चिंतातुर आहेत. काही नगरसेवक पक्ष बदलण्याच्या विचारात आहेत, मात्र त्या पक्षात खरेच उमेदवारी मिळेल काय व त्या प्रभागातील नागरिक त्याच्यावर विश्वास टाकतील काय, अमुक एखाद्या पक्षातील नगरसेवक पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेला, तर त्या पक्षातील जुने कार्यकर्ते त्याचे काम करतील काय, या चिंतेने अनेकांनी पक्षांतर थांबविले असल्याच्या चर्चेला सध्या शहरात उधाण आले आहे. अनेक नगरसेवकांना सत्तेत राहण्याची सवय लागली आहे. मात्र, सत्तांतर नाही झाले तर काय ही भीतीही त्यांना सतावत असल्याने अनेक जण आहे त्याच पक्षात राहणे पसंत करणार असल्याचीही सध्या चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत ६४ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडून आले होते. २०१७मध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत एका प्रभागातून चार सदस्य निवडून द्यावयाचे असले, तरी पक्षाच्या चार उमेदवारांपैकी सक्षम उमेदवारांवर प्रभागातील निवडणुकीचा कल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पालिकेत ९ अपक्ष नगरसेवक आहेत.मात्र, या वेळी अपक्ष उमेदवार निवडणूक लढविणे तितके सोपे राहिले नाही. त्यामुळे अपक्षांची संख्या आपोआपच कमी होणार आहे. या वेळी प्रभागाचे क्षेत्रफळ वाढणार असल्याने अपक्ष नगरसेवक चांगलीच मतदारांपर्यंत पोहचण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना पक्षाच्या निशाणीचा लाभ होण्याचा अंदाज असला, तरी चार उमेदवारांच्या पॅनलमधील सक्षम उमेदवाराचा इतर तीन जणांना लाभ मिळणार आहे.इच्छुकांनी वाढवला जनसंपर्ककाही स्वयंघोषित नेत्यांनी गाडीच्या पाठीमागे भावी नगरसेवक अशा पाट्या लावल्या आहेत. तर काही जणांनी स्वत:ची कार्यालये थाटून आगामी निवडणुकीत आपणच नगरसेवक होणार आहोत. अशी घोषणा केली आहे. परंतु राज्यशासनाचा आदेश अद्याप आला नसल्याने तसेच निवडणुकीचे आरक्षणही जाहीर झाले नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रामवस्था आहे. श्रावण महिना सुरू झाला असून, अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी प्रभागामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. पण आरक्षित झाला तर सर्वश्रम वाया जाण्याची शक्यता असल्याने ते हवालदिल झाले आहे. एकंदरित निवडणुका जाहीर झाल्यानंतरच नेमके काय घडणार?, मतदार राजा कोणाच्या पदरात माप टाकणार? हे निकालानंतरच जाहीर होणार आहे. (वार्ताहर)>आरक्षण : रणधुमाळीला होणार सुरूवातराज्य शासन येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्यास आग्रही असले, तरी त्यासाठी अद्याप निवडणूक विभागाला अध्यादेश मिळाला नसल्याने वॉर्ड की प्रभाग, हे अजूनही गुलदस्तात आहे. त्यामुळे सध्या तरी चारचा प्रभाग होणार, या आशेने अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत . मात्र, वॉर्डरचना झाली नसल्याने मोठी गोची झाली आहे. सध्या चारच्या प्रभाग पद्धतीने अनेकांनी कामाला सुरुवात केली आहे. मात्र, शेवटच्या क्षणाला वॉर्ड झाले तर काय, अशी भीतीही अनेकांच्या मनात आहे. तसेच उमेदवाराचे आरक्षण कशा प्रकारे पडणार, हेही महत्त्वाचे असल्याने वॉर्ड की प्रभाग, उमेदवार आरक्षण व प्रभागरचना यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला रंगत येणार आहे.चारसदस्यीय प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव राहणार आहे. काही प्रभागात अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी एक जागा राखीव असली, तरी एका जागेवर ओबीसी वा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत दोनसदस्यीय पद्धती होती. यातील एक जागा महिलांसाठी राखीव असल्याने उरलेली एक जागा काही प्रभागात अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव असल्याने अनेक मातब्बरांना निवडणूक लढविता आली नव्हती. या वेळी मात्र त्यांची इच्छा पूर्ण होणार असल्याने अनेक प्रभागातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.