शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

लक्ष्मणरेषा थांबली!

By admin | Updated: January 28, 2015 05:06 IST

धोतर आणि चौकडीचा कोट, डोक्याला टक्कल, नाक फुगीर, आखूड मिशा आणि डोळ्यावर चष्मा असणारा आणि चेहऱ्यावर भांबावलेले भाव असलेला माणूस

विकास सबनीस, (लेखक ज्येष्ठ व्यंगचित्रकार आहेत.)धोतर आणि चौकडीचा कोट, डोक्याला टक्कल, नाक फुगीर, आखूड मिशा आणि डोळ्यावर चष्मा असणारा आणि चेहऱ्यावर भांबावलेले भाव असलेला माणूस. कॉमन मॅन. हे चित्र भारतातील कोट्यवधी मूक जनतेचे प्रातिनिधिक चित्र होते. अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा तो मूक साक्षीदार असायचा. या व्यंगचित्राने गेली कित्येक वर्षे सामान्य लोकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आरकेंनी काळानुसार या ‘कॉमन मॅन’मध्येही स्थित्यंतरे घडवून आणली, तोही बदलला. नेहरूंचा काळ ते एकविसाव्या शतकापर्यंतच्या ‘कॉमन मॅन’मध्ये आरकेंनी काळानुरूप बदल केले. आरकेंच्या कलाकृती अजरामर आहेतच; पण त्यातल्या नेमक्या कोणत्या सर्वोत्कृष्ट, हे सांगणेही तितकेच कठीण आहे. तरीही सत्तरीच्या दशकात भारत-पाकिस्तान युद्ध संपल्यानंतर आरकेंनी युद्धावर उपहासात्मक भाष्य करणारे चित्र रेखाटले होते़ ते चित्र म्हणजे पाकला चपराकच होती. तसेच इंदिरा गांधींच्या राजवटीत राष्ट्रपतींवर मार्मिक भाष्य करणाऱ्या आरकेंनी रेखाटलेले चित्र हे समाजाचे प्रतिबिंब होते. आरकेंची विषयाची हाताळणी, विनोदबुद्धी, रेखाटन कौशल्य वेगळेच होते, अतिशय संयमित़़़ त्यामुळेच चोखंदळ वाचकांना ती व्यंगचित्रे आवडतात. पण या ‘कॉमन मॅन’ने लोकांना इतके जिंकले की, पुढे पुढे आरकेंना टपाल खात्यातील उशीर, सदोष टेलीफोन यंत्रणा, अव्वाच्या सव्वा येणारी विजेची बिले, शाळेतील भ्रष्टाचार याविषयी तक्रार करणारी पत्रे येऊ लागली. एका मजेशीर पत्रात म्हटले होते, ‘कृपया ४७ डाऊन ही गाडी अमुक ठिकाणी काही मिनिटे थांबवावी. त्यामुळे आॅफिसातून घरी जाण्यासाठी पुढच्या गाडीची मला चार तास मला वाट पाहावी लागणार नाही़’ बिच्चारा सामान्य माणूस? जीवन जगण्याच्या रोजच्या लढाईत हतबल झालेला असतो. आपल्या समस्येवर कोण उपाय करू शकतो, आपल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कोण देऊ शकते, याचे व्यासपीठ कॉमन मॅन शोधत असतो. आश्चर्य म्हणजे या लोकशाहीच्या दरबारात त्याला प्रशासनापेक्षा, राज्यकर्त्यांपेक्षा कलाकाराबद्दल जास्त विश्वास वाटतो.समाजातील प्रत्येक घटकातील विसंगती शोधणाऱ्या आरकेंना त्यांच्या आयुष्यातील विसंगतीबद्दल एकदा विचारण्यात आले; तेव्हा ते हसत म्हणाले, ‘‘हो, मला जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता व कालांतराने जे.जे.मध्ये चित्रकारांपुढे रेषांची रेखाटने व शैलीबद्दल लेक्चर देण्यासाठी निमंत्रित केले होते.’’ आर. के. लक्ष्मण यांच्या स्मृती जपण्यासाठी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली; मात्र त्यांचा पुतळा उभारून आठवणी जपणे चुकीचे ठरेल. कारण स्वत: आरकेंनी स्मारके, पुतळे यांना विरोध दर्शवणारी, त्यावर भाष्य करणारी व्यंगचित्रे वेळोवेळी रेखाटली आहेत. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारणे त्यांना कदापि आवडले नसते. त्याऐवजी ‘आर. के. लक्ष्मण स्कूल आॅफ कार्टूनिंग’ अशी एखादी संस्था सुरू करून नव्या पिढीला व्यंगचित्र विश्वाचे धडे देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, हे निश्चित.