मुंबई : नवीन पनवेल येथील पिल्लाई अभियांत्रिकी महाविद्यालयाने उच्च न्यायालयाला रिट याचिकेद्वारे अपूर्ण माहिती देऊन वस्तुस्थिती लपविली असल्याचा आरोप सिटीझन फोरम संघटनेने केला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) महाविद्यालयाची चौकशी केल्यानंतर महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस दिली नसल्याबद्दल संबंधित विभाग अधिकाऱ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फोरमने पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली. इंजिनीअरिंग महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांबाबत सिटीझन फोरमने एआयसीटीईकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एआयटीसीईने राज्यातील ११ इंजिनीअरिंग महाविद्यालयांची चौकशी केली होती. चौकशीनंतर या महाविद्यालयांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाला बंदी घातली होती. याबाबत महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
अधिका-यांची चौकशी करा
By admin | Updated: February 14, 2015 04:16 IST