शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने रोखली व्याजदर कपात!

By admin | Updated: June 8, 2016 03:57 IST

उद्योग वर्तुळाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहे

मुंबई : उद्योग वर्तुळाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहे. महागाई पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून वाढत्या महागाईनेच व्याजदर कपातीला ‘खो’ घातल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सादर केलेल्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणातून दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षाचे दुसरे द्वैमासिक पतधोरण मांडताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी कोणत्याही दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे रेपो, सीआरआर, एसएलआर या सारखे सर्व दर कायम राहिले आहेत. मात्र, एप्रिलपासून भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा महागाईच्या झळांनी ग्रासायला सुरुवात केली असल्याचे सांगत, आगामी काळात अन्नधान्य आणि किरकोळ बाजारातील महागाई डोके वर काढेल, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी भाववाढीचा इशाराच दिला आहे. तूर्तास शेतकऱ्यांइतकेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे लक्षही मान्सूच्या आगमनाकडे लागले असून पावसाच्या कामगिरीवर भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर मान्सून उत्तम झाला तर त्याचा निश्चित फरक हा महागाई आटोक्यात आणण्यासाठी पडेल, असेही ते म्हणाले. आगामी काळातील दर कपातीसाठी मान्सून हा मुद्दा कळीचा ठरणार आहेच पण याचसोबत १४ आणि १५ जून रोजी अमेरिकी फेडरल बँकेच्या बैठकीकडेही इतर जगासोबत भारताचेही लक्ष लागलेले आहे. या बैठकीत अमेरिकेत व्याजदरात वाढ होते का, याचाही अनेक देशांच्या अर्थकारणावर प्रभाव पडणार आहे. (प्रतिनिधी)>आॅगस्ट महिन्यामध्ये दरकपातीची शक्यताचालू आर्थिक वर्षातील तिसरे द्वैमासिक धोरण ९ आॅगस्ट २०१६ रोजी मांडले जाईल. आॅगस्ट महिन्यापर्यंत साधारण मान्सूनच्या स्थितीचा अंदाज आलेला असेल. परिणामी, सध्या व्याजदर कपातीसाठी असलेला वाव आणि आॅगस्टपर्यंत बरसणारा मान्सून यामुळे ९ आॅगस्ट रोजी मांडण्यात येणाऱ्या पतधोरणाद्वारे दरकपात होईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. >अर्थव्यवस्थेचा विकास ७.६% दरानेआंतरराष्ट्रीय अर्थकारणात जरी अस्थिरता असली तरी देशांतर्गत पातळीवर सुधार दिसत येत असून भारतीय कंपन्यांची कामगिरीही सुधारत आहे. किंबहुना, मंदीच्या प्रदीर्घ फेऱ्यानंतर गेल्या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांना पुन्हा एकदा नफ्याची झुळूक अनुभवायला मिळाली आहे. मान्सूनवर देशाची आगामी दिशा निश्चितच अवलंबून आहे. पण अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा सर्वंकष विचार करचा चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.6%असेल, असे मत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले आहे. विकासदराचे लक्ष्य गाठणे आणि महागाई आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देणे, या सरकारी भूमिकेशी सुसंगत असेच पतधोरण रिझर्व्ह बँकेने मांडले आहे.- शक्तीकांता दास, वित्तीय व्यवहार सचिवदुसऱ्या टर्मबद्दल राजन म्हणतात...भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत सप्टेंबर २०१६ मध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झाला आहे. याबाबत राजन यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या मुद्यावर मला भाष्य करून मीडियाच्या सध्या सुरू असलेल्या रंजनात खोडा घालायचा नाही. असे निर्णय हे केंद्र सरकार आणि संबंधित व्यक्ती यांच्यातील चर्चेअंती होतात.>कच्च्या तेलाच्या किमतीत घट गेल्या १४ महिन्यांत प्रथमच एक महिन्याच्या फरकात महागाईच्या निर्देशांकात इतकी वाढ नोंदली गेली आहे. याचा थेट संबंध हा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीशी निगडीत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पावणेदोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट झाली होती. परंतु फेब्रुवारी २०१६ पासून पुन्हा तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. याचा परिणाम देशात महागाईने पुन्हा डोके वर काढण्याच्या रूपाने दिसून येत आहे. त्यामुळे तूर्तास महागाई आटोक्यास रिझर्व्ह बँकेने प्राधान्य दिले आहे. >आतापर्यंत पावणे दोन टक्के व्याजदर कपाततारीख दर कपात १५ जाने.२०१५पाव टक्का३ फेब्रु. २०१५बदल नाही७ एप्रिल २०१५पाव टक्का२ जून २०१५पाव टक्का४ आॅगस्ट २०१५बदल नाहीतारीख दर कपात २९ सप्टेंबर २०१५अर्धा टक्का१ डिसेंबर २०१५ बदल नाही२ फेब्रु. २०१६बदल नाही५ एप्रिल २०१६अर्धा टक्का६ जून २०१६बदल नाही