लक्ष्मण मोरे पुणेमध्य प्रदेशातील सीमावर्ती आणि जंगली भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रनिर्मितीचे कारखाने आहेत. शिक्षण, रोजगारासारख्या पायाभूत संधीच येथे उपलब्ध नसल्याने उपजीविकेचे साधन म्हणून लोकांना बेकायदा शस्त्रनिर्मितीचा पारंपरिक व्यवसाय करावा लागत आहे. महाराष्ट्रात एक हजारांपेक्षा अधिक बेकायदा पिस्तुले, रिव्हॉल्वर, बंदूक आणि गावठी कट्यांची विक्री करणाऱ्या रवि ऊर्फ गोविंदसिंग प्यारसिंग बर्नाला (३४, रा. उमरठी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) याला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. उमरठीमधील बेकायदा शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी सात पिस्तुलांसह शस्त्र तयार करण्याचे साहित्य जप्त केले. बर्नाला याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.मोगल सम्राज्याशी लढा देत असताना शीख सैनिकांना शस्त्रे तयार करून देण्याचे काम हा समाज करीत होता. इंग्रजांनी बऱ्याच जातींना गुन्हेगारी आणि दरोडेखोर ठरवले. इंग्रजांपासून वाचण्यासाठी या जाती जंगली भागातच राहत होत्या, असे बर्नाला याने सांगितले. या समाजापर्यंत स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही शिक्षण आणि रोजगार पोचू शकलेले नाही. बर्नाला याने सांगितले की, या भागात आरोग्याच्या सुविधाही नाहीत, हाताला काम नाही, शिक्षण नाही़
रोजगाराअभावी बेकायदा शस्त्रनिर्मिती
By admin | Updated: October 7, 2014 05:30 IST