शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

माळीणची दुर्घटना पाहून सुन्न झालो

By admin | Updated: July 30, 2016 00:04 IST

सकाळी साडे नऊ वाजता माळीणमध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो.

निलेश काण्णव/ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 29 - सकाळी साडे नऊ वाजता माळीणमध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो. पूर्वी या गावामध्ये आलो होतो त्यामुळे समजले की डोंगर कोसळून गावच गडप झाले आहे. किमान दीडशे लोक मृत्यूमुखी पडलेले असणार. काही वाचले असतील तर त्यांना मदत मिळाली पाहिजे. गावात रेंज नव्हती. हे सगळ्यांना समजले पाहिजे म्हणून पळत सुटलो... पण एका वायरमनची गाडी मिळाली. चार किलोमीटरवर एका कड्यावर रेंज आहे माहित होते. त्यानंतर मदत सुरू झाली. माळीण दुर्घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेले निलेश काण्णव यांना अजूनही ते दृश्य आठवले की अंगावर शहारे येतात. निलेश यांनी लोकमतला पाठविलेल्या फोटोने माळीण दुर्घटनेची माहिती जगापुढे आली. देशातील सर्व माध्यमांनी हा फोटो वापरला होता. निलेश सांगतात, त्या दिवशी धो धो पाउस पडत होता. एका पोलिसाचा फोन आला की माळीणमध्ये काही घडल्याचं समजलंय का? चौकशी करण्यासाठी चौकात गेलो. तर माळीणमध्ये काही तरी घडल्याचं समजलं. त्याचवेळी घोडेगावमधून तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर हे माळीणकडे निघाले. लोकमतची चाकणला बैठक होती. त्यामुळे आॅफिसला विचारले की माळीणला दरड कोसळलीय, तिकडे जाऊ की बैठकीस येऊ. आॅफिसमधून सांगण्यात आले की तातडीने माळीणला जा. सुमारे एक तासात माळीणला पोहोचलो. बरोबरच्या कोणीच गाव कधी पाहिले नव्हते. मला मात्र माहीत होते की शाळेच्या शेजारीच गाव वसले आहे. शाळेची इमारत दिसत होाती. मात्र गाव डोंगराखाली गडप झाले होते. काय करावे सुचेनाच. शेकडो लोक गेली असल्याची कल्पना आली. मोबाईलमध्ये फोटो काढत होतो, पण हात थरथरत होता. गाव कुठे गेले, आता पुढे काय आणि कसे करायचे हा मोठा प्रश्न अधिका-यांसमोर होता. मोबाईलला रेंज नव्हती. मला माहीत होते की कोंढरे घाटातील एका कड्यावर मोबाईलवर रेंज येते. पळत सुटावेसे वाटले पण त्याच वेळी लाईट बंद करण्यासाठी आलेला वायरमन दिसला. त्याला विनंती करून गाडी घेतली. विनोद पवार हे पोलीस कर्मचारी माझ्याबरोबर आले. पाऊस कोसळतच होता. तरीही फोन करून तहसील कार्यालय, पोलिसांना कळविले. पण घटनेची भीषणता फोटोशिवाय कळणार नाही. मोबाईलला इंटरनेट कनेक्ट होईल, असे वाटत नव्हते. व्हॉट्सअ‍ॅप सुरू केले. स्पीड नसल्यामुळे अतिशय धिम्या गतीने चालत होते. त्याच वेळी अचानक पूर्वीचे प्रांत अधिकारी गजानन पाटील यांचा फोन आला. तू कुठे आहेस असे विचारले, माळीणमध्ये आहे असे सांगताच त्यांनी अजित पवार यांच्याकडे फोन दिला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या समोर बसलेल्या सर्वांना पुढे मोबाईलचा स्पिकर सुरू करून माझ्याकडून दुर्घटना समजून घेतली. त्यावेळी मी दुर्घटनेत जखमी कमी आहेत, मात्र मृतांची संख्या मोठी असून ढिगारा उपसण्यासाठी मशिनरी आणि माणसांची आवश्यकता असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यांनीही रुग्णवाहिका पाठविल्या आहेत, डॉक्टरांची टीम येत आहे, मशिनरी पाठवित आहोत. मुख्यमंत्री व मी स्वत: दुपारी माळीणला येणार असल्याचे सांगितले. बातमीदार म्हणून माझे कर्तव्य मी बजावले होते. नंतर तातडीने पुन्हा घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात झोकून दिले. ढिगा-याखाली गाडले गेलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात अनेक स्थानिक तरुण झटले होते. यामध्ये अडिवरे, डिंभा, शिनोली, घोडेगाव येथून आलेल्या तरुणांचा सहभाग होता. काही मृतदेह ढिगा-यात अर्ध्याअवस्थेत गाडलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. वाचलेल्या घरांमधून टिकाव, खोरी, पहारी अशी मिळेल ती हत्यारे घेऊन हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तरुण मदत करत होते. चिखलामुळे ढिगा-यात पाय गुडगाभर रूतत होते, सर्वत्र दलदल पसरली होती. त्यामुळे पायातील चप्पल खाली चिखलातच अडकुन पडायच्या म्हणून माझ्या सह अनेकांनी चपला फेकून दिल्या व अनवानी मदत कार्यात झोकून दिले. यामुळे अनेकांच्या पायांना मोठमोठ्या जखमा झाल्या.