शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन क्षमता कशी वाढणार?

By admin | Updated: December 8, 2014 00:57 IST

जिल्ह्यातील सिंचन क्षमता व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने गतकाळात दोन हजारांवर तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु या तलावात साचलेला गाळ आजवर काढलेला नाही.

तलावात गाळ साचला : जिल्ह्याला १५० कोटींची गरज गणेश हूड - नागपूरजिल्ह्यातील सिंचन क्षमता व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने गतकाळात दोन हजारांवर तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु या तलावात साचलेला गाळ आजवर काढलेला नाही. गाळ काढण्याबाबतचे जाचक शासन निकष व निधीचा अभाव अशा परिस्थितीत सिंचन क्षमता कशी वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव, ५६ पाझर तलाव, ३९ गावतलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. तलाव व बंधाऱ्यांची संख्या विचारात घेता जिल्ह्यातील सिंचन वाढण्याची अपेक्षा होती. परंतु तलाव व बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. साठवण क्षमता कमी झाल्याने त्यांचा सिंचनासाठी उपयोग होत नाही. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. परंतु तलावातील गाळ काढण्यासाठी लागणारा निधी नाही. मनरेगाच्या माध्यमातून गाळ काढावा, असे राज्य सरकारचे निर्देश आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात या योजनेवर मजूर मिळत नसल्याने सिंचन विभाग हतबल आहे. तलावातील गाळाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यातीलं असल्याने यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे.प्रस्ताव प्रलंबित...तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी १५० कोटींचा निधी द्यावा, असा प्रस्ताव जि.प.च्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीने वर्षभरापूर्वी राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु तो प्रलंबित आहे. जिल्हा नियोजन समितीकडूनही मागणीनुसार निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. मजूर मिळत नाहीमनरेगा योजनेवरील मजुरांच्या माध्यमातून तलावातील गाळ काढावा, असे सरकारचे धोरण आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात या योजनेवर मजूर मिळत नाही; तसेच यासाठी वेगळा निधी नसल्याने गाळ काढताना अडचणी आहेत. यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय झाला तरच ते शक्य होईल, असे मत सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश गिरी यांनी व्यक्त केले.