कोल्हापूर : संस्कारक्षम वयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अलौकिक कार्याची आणि विचारांची ओळख व्हावी या हेतूने ‘लोकमत’ने सुरू केलेल्या शाहू महाराजांच्या जीवनावरील चित्रकथा उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शैक्षणिक क्षेत्राकडून त्याचे स्वागत होत आहे. शाहू महाराजांच्या जीवनावर अशाप्रकारची प्रथमच चित्रकथा ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होऊ लागल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते एक आकर्षण ठरले आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत’ने हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या या चित्रकथेच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जाणार असून, त्याचे उत्तर विद्यार्थ्यांनी द्यायचे आहे. ९० दिवस हा उपक्रम चालणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या आणि चित्रकथा वाचून अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, साहायक सरव्यवस्थापक (रेस) संजय पाटील आणि ‘लोकमत’टीमने शहरातील ल. कृ. जरग विद्यालय, इंदुमती गर्ल्स हायस्कूल, कळंबा गर्ल्स हायस्कूल, शीलादेवी शिंदे सरकार हायस्कूल, शाहू विद्यामंदिर, गुरुदेव विद्यानिकेतन, फुलेवाडी, आदी शाळांतून या उपक्रमाची माहिती दिली. सर्वच शिक्षकवर्गाने या उपक्रमाचे कौतुक केले असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)विचारप्रवर्तक उपक्रम ‘लोकराजा राजर्षी शाहू’ ही ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होत असलेली चित्रकथा एक चांगला उपक्रम आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव समाजमनावर आहेच. आता त्यांचे कार्य अत्यंत सोप्या आणि चित्रकथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडले जात आहे. यामुळे शाहूंचे विचार व कार्य प्रभावीपणे समजेल अशी अपेक्षा आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही लहान वयात शाहू महाराज कळले पाहिजेत, या हेतूने सुरू केलेला हा उपक्रम विचार प्रवर्तकाचे काम करणारा आहे. - श्रीमंत शाहू छत्रपतीसंस्कारक्षम चित्रकथाज्या वयातील मुलांसाठी हा उपक्रम राबविला जातोय ते माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. संस्कारक्षम वयात शाहू महाराजांचे कार्य माहीत होणार आहे. आमच्या पिढीत बी.ए. होईपर्यंत आम्हाला शाहू महाराजांचे कार्य वाचायला मिळाले नाही. कारण त्यावेळी पुस्तके, ग्रंथ फारसे नव्हते. त्यामुळे शाहू महाराज कळायला उशीर झाला. त्यामुळे ‘लोकमत’ने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. लहान मुलांना तर शाहू महाराज कळतीलच; त्याचबरोबर त्यांच्या अशिक्षित पालकांनाही ते कळतील.- डॉ. जयसिंगराव पवार बालवयात संस्कार काही गोष्टी अशा असतात की, वयाच्या आठव्या, नवव्या वर्षांच्या मुलांना चांगल्या पद्धतीने कळू शकतात. या वयातील मुलांना शाहू महाराजांची खरी प्रतिमा सांगण्याचा उपक्रम अत्यंत चांगला आहे. लहान वयात शाहूंचे विचार मनावर बिंबले गेल्यास ते कायमस्वरूपी लक्षात राहतील. चित्रकथांच्या माध्यमातून शाहूंचे चरित्र विद्यार्थ्यांना लवकर समजणार आहे. त्यांच्याविषयी जाणीवपूर्वक निर्माण केलेले गैरसमजही दूर होतील. - डॉ. रमेश जाधव, इतिहास संशोधकअसा पहिलाच प्रयोगराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र चित्रकथेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा माझ्या माहितीप्रमाणे हा पहिलाच प्रयोग आहे. आतापर्यंत अनेकवेळा चित्रकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या गोष्टीरूप असायच्या; परंतु शाहू महाराजांविषयीचा हा प्रयत्न अत्यंत चांगला आहे. लहानवयातच शाहू महाराजांचे विचार पोहोचविण्याची आवश्यकता होती आणि हे काम ‘लोकराजा राजर्षी शाहू’ ही ‘लोकमत’ची चित्रकथा करेल, असा मला विश्वास वाटतो. - इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक शाहू विचारांची पिढी घडेलआपल्या संस्थानात शिक्षणाला आणि तेही मोफत व सक्तीचे शिक्षण करणारा राजा म्हणून आपण शाहू महाराजांकडे पाहतो. मुलांनी शिकावे अशी त्यांची भूमिका होती. जो पालक आपल्या मुलाला शाळेत पाठविणार नाही त्यालाच दंड करणारा असा हा राजा होता. महाराजांचे कार्य विद्यार्थीदशेत असलेल्या मुलांना समजावे म्हणून केलेला हा प्रयोग अतिशय चांगला आहे. चित्रकथांच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या विचारांची पिढी तयार होईल.- वसंत मुळीक, अध्यक्ष मराठा महासंघ
‘राजर्षीं’च्या जीवनावरील चित्रक थेस बालचमंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: January 31, 2015 00:02 IST