शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा महावितरणला २ कोटींचा फटका !

By admin | Updated: October 17, 2016 21:20 IST

गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी तीनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे ४०४ तर लघुदाब वाहिनीचे

बाळासाहेब जाधव ,

लातूर, दि. १७ - गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी तीनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे ४०४ तर लघुदाब वाहिनीचे १५४६ विद्युत खांब कोसळले आहेत. शिवाय, ४० रोहित्र नादुरुस्त झाल्याने १ कोटी ९० लाखांचे नुकसान झाल्यामुळे महावितरणला मोठा फटका सहन करावा लागला आहे.

लातूर परिमंडळात लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर तीनवेळा अतिवृष्टी झाली. यामुळे ५ लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गावोगावी विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणलाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात उच्चदाब वाहिनीचे ४०४ विद्युत खांब कोसळले आहेत. तर लघुदाब वाहिनीचे १५४६ खांब कोसळले आहेत. शिवाय, विविध गावांतील ४० रोहित्र नादुरुस्त झाल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय झाली. तीन टप्प्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ६५.५५ किलोमीटर लांबीच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत.

यात लातूर जिल्ह्यात महावितरणचे १ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लातूरबरोबरच बीड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उच्च व लघुदाब वाहिनीचे १४१६ पोल नादुरुस्त झाले आहेत. तर ४५ रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. ८४.५२ किलोमीटरच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या असून, बीड जिल्ह्यात महावितरणचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, १५ रोहित्र खराब झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणचे विद्युत पोलही उखडून पडल्याने किमान ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. 

लातूरबरोबर बीड व उस्मानाबादमध्येही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. येथील उच्च व लघुदाबाचे पोल उखडून पडले आहेत. तर ६० रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. तसेच वीज वाहिन्याही तुटल्याने दोन्ही जिल्ह्यांतून ६५ लाखांचा फटका महावितरण कार्यालयास बसला आहे. 

गेल्या चार-पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील लातूर, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये किमान २ कोटी ५५ लाखांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाल्याने अनेक गावे अंधारात होती. दरम्यान, महावितरणची यंत्रणा लावून या गावांतील वीज वाहिन्या व रोहित्र दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू केले आहे. यामुळे काही गावांतील विद्युत प्रवाह सुरळीत झाला आहे. तर उर्वरित ठिकाणचेही काम प्रगतीपथावर सुरू असल्याने नागरिकांची सोय झाली असल्याचे महावितरण लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी  लोकमतशी बोलताना सांगितले