वसई : आज शुक्रवारी सकाळी विरार पश्चिमेस एका इमारतीमधील सदनिकेत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघे जण मृत्युमुखी पडले. ही घटना सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.विरार पश्चिमेस दळवी हॉस्पिटलनजीक असलेल्या मनिष को. ऑप. हा. सोसायटीमध्ये राहणार्या शैलेश ढेकणे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व आग लागली. अल्पावधीत ही आग पसरली. या स्फोटात शैलेश ढेकणे (३९), पत्नी प्रतिभा ढेकणे (३७) व मुलगा लाभेश ढेकणे (९) या तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. सिलेंडरच्या स्फोटामागची कारणे पोलीस शोधत आहेत. (प्रतिनिधी)
विरार येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; ३ जण मृत्युमुखी
By admin | Updated: May 9, 2014 22:31 IST