पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे एका नामांकित बॅंकेमध्ये खाते उघडून हडपसर येथील कंपनीच्या नावाने बनावट धनादेश तयार करुन त्याद्वारे ४ लाख स्वत:च्या खात्यामध्ये वर्ग करणा-या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.सचिन उमेश बिडवाई (वय ४६, रा. ६७२, नारायण पेठ) असे या भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी रमेश वामनराव कहाळेकर (वय ५८, रा. ओम अलंकार, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. कहाळेकर हे बॅंक व्यवस्थापक आहेत. हडपसर येथे सिम्फोनी एंटरप्रायझेस नावाची कंपनी आहे. बिडवाई याने स्वत:च्या नावाची खोटी कागदपत्रे सादर करुन बॅंकेमध्ये खाते उघडले. तसेच सिम्फोनी एंटरप्रायझेसच्या नावाने बनावट धनादेश तयार केले. त्यावर कंपनीचे मालक थोरात यांची सही करुन हा धनादेश बॅंकेमध्ये भरला. त्याद्वारे ४ लाख रुपये काढून स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर केले.
बनावट धनादेशाद्वारे फसवणूक
By admin | Updated: May 17, 2014 21:45 IST