शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

फुले कलामंदिराचे भाडे वाढणार

By admin | Updated: June 11, 2016 03:56 IST

सावित्रीबाई फुले कलामंदिर या नाट्यगृहाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाने महासभेला सादर केला आहे.

डोंबिवली : सावित्रीबाई फुले कलामंदिर या नाट्यगृहाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाने महासभेला सादर केला आहे. व्यावसायिक नाट्यसंस्थांसाठी २५ टक्के भाडेवाढ सुचवताना इतर सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे भाडे कल्याणमधील आचार्य प्र.के. अत्रे रंगमंदिरातील भाड्यानुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावित भाडेवाढीमुळे नाट्यरसिकांना भुर्दंड बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे १६ जूनला होणाऱ्या महासभेत लोकप्रतिनिधी, काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. सध्या वीजभारनियमन, देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च पाहता ही भाडेवाढ अपरिहार्य आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. २००७ मध्ये नाट्यगृह सुरू झाल्यापासून कोणीतीही भाडेवाढ झाली नाही. तसेच नाट्यसंस्थांच्या भाड्यात २५ टक्के भाडेवाढ आवश्यक आहे. भाडेवाढीकडे लक्ष वेधताना मुंबई व उपनगरांतील नाट्यगृहांमधील भाडेदराचा तुलनात्मक तक्ता प्रस्तावाला जोडण्यात आला आहे. फुले कलामंदिरात सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीन सत्रांत कार्यक्रम वा नाट्यप्रयोग होतात. व्यावसायिक नाट्यसंस्थांसाठी प्रस्तावित भाडेवाढ पाहता प्रत्येक सत्राचे दर वेगवेगळे आहेत. १०० रुपये तिकीट असल्यास सकाळच्या सत्रात सध्या ३ हजार २०० रुपये, दुपारी ३ हजार ८०० आणि रात्री ३ हजार ६०० रुपये भाडे आकारले जात आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यानच्या कार्यक्रमांसाठी हे भाडे आहे. तर, रविवारी सुटीच्या दिवशी ५ हजार २०० रुपये घेतले जातात. तिकीटदर २०० व त्यापेक्षा अधिक असल्यास त्यासाठीही वेगवेगळे भाडे आकारले जात आहे. दरम्यान, प्रशासनाचा २५ टक्के वाढीचा प्रस्ताव पाहता १०० रुपयांपर्यंत तिकीटदर असल्यास सकाळच्या सत्रात प्रयोग घ्यायचा असल्यास ४ हजार रुपये संबंधित नाट्यसंस्थेला मोजावे लागणार आहेत. दुपारच्या सत्रात ५ हजार ७५० रुपये, तर रात्री ४ हजार ५०० रुपये भाडे मोजावे लागेल. जर तिकीटदर १०० ते १९९ रुपयांत असेल तर सकाळच्या सत्रासाठी ६ हजार ८७५ रुपये, दुपार व रात्रीच्या सत्रात ८ हजार १२५ रुपये भाडे भरावे लागणार आहे. २०० रुपयांपेक्षा अधिक तिकीटदर असेल तर तिन्ही सत्रांत १२ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. बालनाट्यासाठी दिलेली २५ टक्क्यांची सवलत काढून घ्यावी, असेही प्रस्तावात म्हटले आहे. दरम्यान, व्यावसायिक नाट्यसंस्थांच्या व्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्थांसाठी असलेल्या भाडेदरातही अत्रे रंगमंदिराच्या भाडेदराच्या धर्तीवर बदल सुचवले आहेत. यात अनुदानित शाळांच्या कार्यक्रमाला सध्या १० हजार भाडे घेतले जाते. प्रस्ताव मान्य झाल्यास त्यांना १५ हजार भरावे लागेल, तर विनाअनुदानित शाळांना २० हजार रुपये मोजावे लागणार आहे. खाजगी शैक्षणिक संस्था व नृत्य क्लासेस यांच्यासाठी अनुक्रमे २५ आणि २० हजार भाडे ठरवले आहे. शैक्षणिक संस्था पालिका हद्दीबाहेर असल्यास त्यांना २७ हजार रुपये मोजावे लागतील. (प्रतिनिधी)>...तर प्रयोग करणार नाही- नाट्यनिर्माता संघआधीच सुविधांची बोंब, त्यात केडीएमसी २५ टक्के भाडेवाढ करत असल्यास यापुढे डोंबिवलीत नाट्यप्रयोग करणार नाही, असा पवित्रा मुंबई नाट्यनिर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव यांनी घेतला आहे. एकही पैसा वाढवून देणार नाही. आधीच १० हजार रुपये भाडे आहे. मुंबईहून डोंबिवलीला येण्यासाठी ७ हजार रुपये खर्च येतो. त्यात २५ टक्के भाडेवाढ करत आहेत, ते आम्हाला परवडणारे नाही. भाडेवाढीचा निर्णय घेताय, परंतु त्याआधी आपण काय सुविधा देतो, याचाही विचार केडीएमसीने करणे गरजेचे आहे. रेल्वेस्थानकापासून सावित्रीबाई फुले नाट्यगृह लांब आहे. साधी बसची सुविधाही रसिकांना आजपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे प्रस्तावित भाडेवाढ अमान्य आहे. जर वाढीचा निर्णय घेतल्यास डोंबिवलीत प्रयोग करणार नाही, असे जाधव म्हणाले. ठाणे महापालिकेनेही भाडे वाढवले होते. तेथील भाडे कमी करण्यासाठी प्रशासन अनुकूल आहे. तो निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचेही जाधव यांनी सांगितले.