बुलडाणा : उन्हाळ्याच्या सुटीमध्ये देवदर्शन, पर्यटनाला जाणार्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाने ह्यआवडेल तेथे प्रवासह्णही योजना सुरू केली आहे. बहुतेक प्रवासी या योजनेचा बर्यापैकी लाभ घेतात. आता १५ जून पासून या योजनेच्या भाड्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाने १0 ते १५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे ह्यअवडेल तेथे प्रवासह्ण पुन्हा स्वस्त झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये बहुतेकजण फीरायला जातात. देवदर्शन, पर्यटन आणि खास उन्हाळ्यात नातेवाईकांच्या भेटी गाठीचा अनेकांचा बेत असतो. यासाठी संपूर्ण कुटुंब जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा याचा लाभ प्रवाशा बरोबरच एसटीला सुध्दा व्हावा म्हणुन राज्य परिवहन महामंडळाने ह्यआवडेल तेथे प्रवासह्ण ही योजना सुरू केली. या योजने अंतर्गत प्रवाशांना एक रकमी प्रवासभाडे भरून चार दिवसाची पास दिल्या जाते. यामध्ये प्रवास भाड्यात बर्यापैकी सुट मिळते. आता शाळांच्या सुट्या संपत आल्या, पावसाळ्याला सुध्दा सुरूवात होत आहे. त्यामुळे एसटीचे प्रवासी भारमान कमी होते. त्यामुळे १५ जून पासून या योजनेच्या भाड्यामध्ये कपात करण्यात आली आहे. काल पर्यंत चार दिवसाच्या प्रवासासाठी ८00 रुपये मोजावे लागत होते. आता प्रवास भाडे ७४0 रुपये आणि स्मार्ट कार्डाचे ४0 रुपये असे ७८0 रुपये द्यावे लागणार आहे. ही भाडे कपात १४ ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. १४ ऑक्टोबर पासून पुन्हा नव्याने या योजनेची भाडेवाढ होईल. यावर्षी मागील दरांपेक्षा जवळपास १0 ते १५ टक्के दराने भाड्यामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आवडीचा प्रवास स्वस्त झाला आहे. कायम तोट्यात असल्याचा शिक्का राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. तोट्याच्या नावाखाली परिवहन महामंडळाकडून सातत्याने प्रवासी भाड्यामध्ये वाढ केली जाते. अलीकडच्या तीन वर्षात जवळपास दुपटीने सर्वच भाडे दरामध्ये वाढ झालेली आहे. सातत्याने ही भाव वाढ सुरू असताना आवडेल तिथे प्रवास या प्रवास सवलत योजनेमध्ये १0 ते १५ टक्के भाडे कपात करून प्रवाशांना महामंडळाने सुखद धक्का दिला आहे. एसटी महामंडळाच्या स्थापनेपासून यावर्षी प्रथमच एसटीचा वर्धापनदिन राज्यभर साजरा होत असताना नेमके या वर्धपान दिनीच प्रवासी भाडेवाढ करून ह्यसामान्याचीह्ण म्हणविणार्या एसटीला भाडेवाढीची नामुस्की पत्कारावी लागली होती. आता आवडेल तेथे प्रवास योजनेमध्ये भाडे कमी करून प्रवाशांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे. गर्दीच्या कालावधीसाठी या तिकिटांच्या दरांपेक्षा कमी गर्दीच्या हंगामात एसटीने थोडासा दिलासा दिला. इतर वाहतुकीच्या तुलनेत एसटीचे भाढे वाढत राहिल्याने प्रवाशांना बसचा प्रवास डोईजड होत असल्याचे चित्र दिसत आहे.
** योजनेची वर्षभरात दोन गटात केली विभागणी
या योजनेची प्रामुख्याने दोन गटांत विभागणी केली असून, १५ ऑक्टोबरपासून ते १४ जूनपयर्ंत गर्दीच्या कालावधीत तिकिटांचे वाढीव दर राहणार आहेत. तर कमी गर्दीच्या म्हणजे १५ जूनपासून ते १४ ऑक्टोंबरपयर्ंत तिकिटांत दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे ७ दिवसांच्या प्रवासासाठी प्रौढांना साध्या बसेससाठी १ हजार ४00 तर मुलांसाठी ७00 रुपए भरून प्रवास करता येणार आहे. निमआराम बससाठी प्रौढांना १ हजार ६0५ तर मुलांसाठी ८0५ रुपए ७ दिवसांच्या प्रवासासाठी भरावे लागतात. सात दिवसांच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी १ हजार ७३0 तर मुलांसाठी ८६५ रुपए भरून प्रवास करता येणार आहे.