शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

शेतकरी करताहेत "ई पोर्टलवर' खरेदी

By admin | Updated: October 11, 2016 17:14 IST

जागतिक बाजारपेठ आता 'ई पोर्टलवर' भरत असून, ग्राहकांकडून त्याचे जोरदार स्वागत होत आहे. एका क्लिकवर कोणत्याही वस्तूंची घरबसल्या खरेदी करता

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 11 -  जागतिक बाजारपेठ आता 'ई पोर्टलवर' भरत असून, ग्राहकांकडून त्याचे जोरदार स्वागत होत आहे. एका क्लिकवर कोणत्याही वस्तूंची घरबसल्या खरेदी करता येत असल्याने ग्राहकांना बाजारात जाण्याची गरज संपली आहे. यात आता शेतकरी देखील मागे राहिला नाही. गेल्या सात महिन्यात शेतकऱ्यांनी ६६ लाख रुपयांच्या एक लाखांहून अधिक वस्तूंची खरेदी या 'ई मंडईतून' केली आहे. मोबाईल, पादत्राने, विविध इलेक्ट्रॉॅनिक वस्तू, कपडे, सौंदर्य प्रसाधने, पुस्तके इथपासून ते भाजी देखील आता घरबसल्या खरेदी करता येऊ शकते. विविध बहुराष्ट्रीय कंपन्या देखील या व्यावसायात पडल्या आहेत. या ई कॉमर्समधील मॉलमध्ये शेतमाल असला तरी शेतमाल उत्पादनासाठी आवश्यक साधनांची मात्र कमतरता होती. स्टार्ट अप अंतर्गत सुरु झालेल्या अ‍ॅग्रो स्टार या कंपनीने ही उणीव भरुन काढली आहे. त्या अंतर्गत विविध प्रकारची बियाणे, खते, लहानसहान कृषी यंत्रे, ताडपत्री, खते फवारणी यंत्र असे साहित्य एका फोनवर उपलब्ध होत आहे. त्यासाठी कंपनीचे संकेतस्थळ अथवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांनी फोन केल्यास हवे असलेल्या कृषी पुरक साधनांची मागणी नोंदविली जाते. त्याचा पुरवठा मागणी नोंदविल्यानंतर सहा दिवसांच्या आत केला जातोे. शेतकऱ्यांना देखील तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन लहानसहान खरेदीसाठी पैसा व वेळ घालविण्याची गरज उरली नसल्याने त्यांच्याकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्च २०१६ मध्ये या सेवेच्या माध्यमातून २ लाख ५५ हजार ५८९ रुपयांच्या १ हजार ३६५ वस्तू या शेतकऱ्यांनी मागविल्या होत्या. त्यात सप्टेंबर अखेरीस १० हजार ७४६ वस्तूंपर्यंत वाढ झाली. सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांनी तब्बल १७ लाख ५६ हजार १५ वस्तूंची खरेदी शेतकऱ्यांनी या माध्यमातून केली आहे. ग्रामीण भागात दूरवर जाळे असलेल्या टपाल विभागाच्या माध्यमातून या वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. महिनापुरविलेल्या वस्तूंची संख्याकिंमतमार्च २०१६१,३६५२,५५,५८९एप्रिल२,२४८३,२२,३९८मे४,९६५६,६३,०५२जून७,६९८१०,५०,०१९जुलै८,५४८१३,२७,३४७आॅगस्ट८,५५२१२,७५,७०२सप्टेंबर१०,७४६१७,५६,०१५एकूण१,०४,१२२६६,५०,१२२टपाल विभागाने माहिती, विविध वस्तू व शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणाची सुविधा देण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. त्याचा फायदा घेत एका कंपनीने कृषी साधने पुरविण्यासाठी टपाल विभागाची सेवा घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन छोट्या-मोठ्या वस्तू खरेदी करण्याची गरज संपली आहे. उत्पादक ते थेट शेतकरी असा वस्तूंचा पुरवठा होत असल्याने अल्पदरात या वस्तू मिळत आहेत.

- गणेश सावळेश्वरकर, पोस्टमास्टर जनरल पुणे विभाग