शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

महागडी औषधे रुग्णांच्या माथी!

By admin | Updated: February 23, 2015 05:13 IST

वेळेवर दरकरार (रेट कॉन्ट्रॅक्ट) करायचे नाहीत आणि दरकरार संपले म्हणून आधी ज्यांना कंत्राटे दिली आहेत, त्यांनाच वारंवार मुदतवाढ द्यायची

अतुल कुलकर्णी, मुंबई - वेळेवर दरकरार (रेट कॉन्ट्रॅक्ट) करायचे नाहीत आणि दरकरार संपले म्हणून आधी ज्यांना कंत्राटे दिली आहेत, त्यांनाच वारंवार मुदतवाढ द्यायची, ज्यांना मुदतवाढ दिली अशांनी जुन्या दराने औषधे देण्यास नकार दिला की तीच औषधे महागड्या दराने खुल्या बाजारातून घ्यायची असे अधिकारी आणि ठेकेदारांचे मोठे रॅकेट सध्या महाराष्ट्रात कार्यरत झाले आहे. गोरगरीब रुग्ण मात्र या टेंडरच्या आणि रॅकेटच्या जाळ्यात भरडले जात आहेत.रुग्णांना प्रिस्क्रीप्शन न देता थेट औषधे द्यावीत असे सरकार म्हणते, मात्र त्याच सरकारच्या दवाखान्यात जीवनावश्यक औषधे नाहीत. दुसरीकडे गेली दोन वर्षे औषधखरेदीसाठीचे नियमित दरकरारच केलेले नाहीत. असे दरकरार नाहीत म्हणून ठेकेदारांना, कंपन्यांना सोयीनुसार मुदतवाढ दिली जात आहे. ती देतानाही या रॅकेटमधील अधिकारी आणि ठेकेदार आधी स्वत:च्या फायद्याचा विचार करीत आहेत आणि हे सगळे प्रकार राजरोसपणे गोरगरीब रुग्णांच्या नावावर चालू आहेत. एकट्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. या विभागाने २०११ साली औषध खरेदीसाठी टेंडर काढले. २०१२मध्ये कधीतरी त्याला अंतिम स्वरूप दिले. मार्च २०१३पर्यंत त्याची मुदत होती, त्यानंतर त्याला वारंवार एकतर्फी मुदतवाढ दिली गेली. नवीन टेंडर १ मार्च २०१४ला काढले गेले. त्याला २१ दिवसांची मुदतवाढ दिली गेली. पुन्हा हेच टेंडर जुलै-आॅगस्ट २०१४मध्ये काढले गेले. काही टेंडरना एकवेळा तर काहींना दोन वेळा मुदतवाढ दिली गेली. पण कोणत्याही टेंडरला अंतिम स्वरूप दिले गेले नाही.गेल्या दोन वर्षांत आधी दर निश्चित करून करार केले गेले नाहीत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणच्या डॉक्टर्स, अधिकाऱ्यांनी स्थानिक बाजारातून कोटेशन मागवून तीच औषधे चढ्या दराने खरेदी केली. त्यामुळे डब्ल्यूएचओ, जीएमपी, परफॉर्मन्स सर्टिफिकेट, नो कन्व्हिक्शन सर्टिफिकेट, उलाढालीचे निकष यापैकी कशाचाही विचार न करता सररास औषधखरेदी केली जात आहे. त्याचा परिणाम खरेदी केल्या जाणाऱ्या औषधांच्या दर्जावरहोऊ लागला आहे. स्थानिक पातळीवर कोणतेही निकष न पाळता स्थानिक पातळीवर होणाऱ्या खरेदीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी पाठीशी तर घालत आहेतच; शिवाय यासाठी खतपाणीदेखील घालत आहेत. परिणामी, सरकारचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. नवीन टेंडर निश्चित करण्याची एक तारीख ठरवावी, तोपर्यंतच जुन्या दरकरारांना मुदतवाढ द्यावी आणि यात एकसुसूत्रता व पारदर्शकता आणावी असे विद्यमान संचालक प्रवीण शिनगारे यांना आजतागायत वाटलेले नाही. एकूणच औषध खरेदीत काही ठिकाणी मुद्दाम तर काही ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता नसणारे अधिकारी असल्याने कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे. आज राज्यातल्या अनेक सरकारी दवाखान्यांत गरज असणारी औषधे नाहीत आणि ज्यांची गरज नाही अशा औषधांचे भरमसाठ साठे पडून असल्याचे चित्र आहे.