शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

शहाणे झाले तरीही ते वेडेच!

By admin | Updated: May 22, 2014 02:16 IST

त्यांचे अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले.

नागपूर : त्यांचे अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले. अनेक वर्षांच्या उपचारानंतर आता ते बरे झाले. आता आपले कुटुंबीय येतील. आपला हात धरून घरी नेतील आणि उर्वरित जीवन कुटुंबीयांसह सुखासमाधानात आनंदाने जगायला मिळेल, अशी स्वप्नेही त्यांनी रंगविली. मात्र, समजदारांच्या मतलबी दुनियेचे वास्तव दुसर्‍याच क्षणाला त्यांच्या लक्षात आले. बरे झाल्यावर कुणीही त्यांना घरी नेण्यास तयार नाहीत. यासाठी समोर केल्या जाणार्‍या कारणांनी बसणारे झटके त्यांना शॉकपेक्षाही वेदना देणारे आहेत. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात बरे झालेले असे तब्बल २0५ जण आजही नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत.

महापालिकेच्यावतीने मागील वर्षी या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी ‘सुदामा मित्र’ योजनेला मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीने पुनर्वसन केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३0 लाख ५८ हजार ३९४ रुपयांच्या कामासासाठी निविदा मागविल्या, परंतु आजही याचे काम थंडबस्त्यात आहे.

राज्यातील ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी या चारही ठिकाणच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची स्थिती थोड्याबहुत अंतराने सारखीच आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच त्यांच्या भविष्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. नागपूर मनोरुग्णालयात बरे झालेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. ११६ महिला तर ८९ पुरुष आहेत. एकेकाळी हे कुणी पोलिसांकडून तर कोणी स्वकियांकडून मनोरुग्णालयात दाखल झाले. त्यांचे अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात गेले.

अनेक वर्षांंच्या उपचारानंतर आता ते बरे झाले. रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या पत्त्यांवर ते बरे झाल्याची बातमी दिली. परंतु तो पत्ताच अस्तित्वात नसल्याने पत्र परत आले.

मनोरुग्णाचे जीवन मागे टाकलेल्या या रुग्णांना सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याची इच्छा आहे. भविष्याची स्वप्ने रंगवत आहेत. कुणीतरी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल या ‘वेड्या’ आशेवर ही शहाणी झालेली माणसे आपल्या नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत! नागपूरचे प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करीत आहे. सरकारच्या अपुर्‍या निधीतूनही ते बरे झालेल्यांना स्वयंरोजगाराचे धडे देत आहेत; परंतु ते अपुरे पडत आहे.

दरम्यानच्या काळात महापालिकेने उपचारानंतर बरे झालेल्या अशा रुग्णांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली. सुदाम मित्र योजनेतून आशेचा किरण दाखविला. धंतोली झोन कार्यालय परिसरातील महापालिका शाळेची इमारतीची नेमणूक केली. त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी हलक्या कामांचे त्यांना प्रशिक्षण दिले जाणार होते. त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांनीच विकाव्या, यासाठी तेथेच स्टॉलही लावून देणार होते. त्यांना बाहेरच्या जगाशी हळूहळू एकरूप करण्याचा हा प्रयत्न होता. परंतु वर्षे होऊनही महापालिकेची सुदाम मित्र योजना सुरूच झाली नाही. त्यांनी जीवनाशी संघर्ष करून मनोरुग्णत्वावर मात केली. मात्र, त्यांच्या दुर्दैवाचे फेरे दूर करण्यास शासन आणि समाज कमी पडत असल्याचे यावरून दिसून येते. (प्रतिनिधी)