व्हीएनआयटीचा अहवाल : नियोजनाच्या अभावाचे कारणवसीम कुरेशी - नागपूरविश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरींग (व्हीएनआयटी) ने सर्वेक्षण करून शहरातील चार उड्डाणपुलांच्या कामात त्रुटी असल्याचे सांगितले आहे. मेहंदीबाग उड्डाणपुल, रामझुला, स्टेशन रोड उड्डाणपुल आणि मानकापूर उड्डाणपुलाचा अभ्यास व्हीएनआयटीने केला. यातील मेहंदीबाग, मानकापूर, स्टेशन रोड आणि रामझुल्याच्या कामात त्रुटी असल्याचा उल्लेख केला आहे. उड्डाणपुलांबाबत व्हीएनआयटीने महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासला अहवाल सादर केला आहे. मागील वर्षापासून व्हीएनआयटीच्या वाहतूक अभियांत्रिकी शाखेची चमू शहरातील पुलांबाबत अभ्यास करीत होती. यातील मेहंदीबाग पुलाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालात अनेक त्रुटींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे हे स्पष्ट होत आहे की हा पूल तयार करणे महत्त्वाचे नव्हते. सन २००६ मध्ये १८ कोटी रुपये खर्चून ७५० मीटर लांबीचा हा पूल तयार करणे सुरू झाले. रेल्वे फाटक बंद करण्यासाठी हा पूल तयार करण्यात आला. परंतु फाटक सुरूच ठेवणे भाग पडले. त्यानंतर अंडरब्रिजही तयार करण्यात आला. परंतु त्यात पाणी साचते. व्हीएनआयटीच्यानुसार लालगंज पुलाचा उतार योग्य जागेवरून दिला गेला नाही. त्याला पुढे वाढवून उतरविण्याची गरज होती. सर्वेक्षण करणाऱ्या चमूने नियोजनाच्या अभावी वाहतुकीत हतबलतेने होणाऱ्या चुकींचा व्हिडीओ तयार केला आहे. उल्लेखनीय म्हणजे मेहंदीबाग पुलाबाबत मागील वर्षी नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर महापालिकेने व्हीएनआयटीकडे पुलाचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविली. रामझुल्यामुळे अपघाताची शक्यता वाढलीव्हीएनआयटीच्या चमूने रामझुला पूल तयार झाल्यानंतर ६ दिवसांनी जयस्तंभ चौकाचे सर्वेक्षण सुरू केले. आतापर्यंतच्या सर्वेक्षणात येथे अपघाताची शक्यता वाढली आहे. चौकातून दररोज ६ हजारापेक्षा जास्त वाहने ये-जा करतात. रेल्वेच्या विभागीय कार्यालयाचे दोन गेट, मोहननगरकडे जाणारा मार्ग, बँक, सैन्य दलाचे कार्यालय, स्टेशन, रामझुलाकडे जाणारे दोन रस्ते यामुळे जयस्तंभ चौकात वाहतूक विस्कळीत झाली आहे. रामझुल्याला वाढवून पुढे उतरवणे योग्य होते. चमूने स्टेशन रोडवरील उड्डाण पूल पूर्णपणे अयोग्य ठरविला आहे. वाहतुकीत गती आणण्यासाठी जरी हा पूल तयार केला असला तरी व्हीएनआयटीच्या सर्वेक्षणात चौकात वाहनांना अडथळा येत असल्याचे दिसून आले. चमूने वाहनचालकांवरील तणाव आणि त्यांच्या हृदयाचे ठोके याचा समावेशही आपल्या पाहणीत नमूद केला आहे.दूरवर संपविला मानकापूर पूलमानकापूर उड्डाण पुलाच्या अभ्यासादरम्यान व्हीएनआयटीच्या चमूने कोराडी नाक्याकडे पूल संपविण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. दोन किलोमीटरचा फेरा लावावा लागत आहे. या सर्व पुलांच्या निर्मितीच्या पूर्वी कोणत्याच वाहतूक अभियंता किंवा तज्ज्ञ व्यक्तीचे सहकार्य न घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दूरदृष्टीचा अभाववाहतूक अभियांत्रिकी विभागाच्या दृष्टीने पुलांमध्ये अनेक त्रुटी दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे निर्मिती करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेण्यात आला नाही. मेहंदीबाग पुलाच्या बाबतीत स्पष्टपणे दिसते की सर्व पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतरही त्रुटी काढण्याची जबाबदारी दुसऱ्याला सोपविण्याची वेळ आली. व्हीएनआयटीच्या ट्रान्सपोर्ट सेक्शनचा विद्यार्थी विनोदकुमार, प्रत्युष मोटवानी, आकाश अग्रवाल, शिवराज यलपबल्ली, आदित्य तांगी, पंकज कुकलोरिया, सौरभ जैन, प्रो. लांडगे यांच्या नेतृत्वात पुलांवर अभ्यास करीत आहेत.नियोजनाचा अभाव‘संबंधित पुलांच्या निर्मितीत नियोजनाची कमतरता दिसून येते. मेहंदीबाग पुलात अनेक त्रुटी दिसतात. सध्याच्या त्रुटींना दुर करण्यासाठी काही पर्याय आहेत. स्टेशन रोड उड्डाण पूल तर अनावश्यक असल्याचे दिसते आहे. रामझुल्याच्या पहिल्या टप्यानंतर काही त्रुटी पुढे येत आहेत. पुढील टप्यात याकडे लक्ष दिल्यास कमी खर्चात चांगले काम होऊ शकेल. मानकापूर उड्डाण पुलालाही चुकीच्या जागी उतरविण्यात आले आहे.’-विश्रत लांडगे, सहायक प्राध्यापक, ट्रान्सपोर्ट सेक्शन, व्हीएनआयटी
चार उड्डाण पुलांच्या कामात त्रुटी
By admin | Updated: February 1, 2015 00:55 IST