शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

मुंबई पालिकेचे राज्य सरकारवरील अवलंबित्व वाढणार

By admin | Updated: August 7, 2016 01:52 IST

जीएसटी संपूर्ण देशात एकच असावा. मालाची वाहतूक करताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कर भरावे लागू नयेत, अशा घटकांसाठी राज्य जीएसटीचा विचार करत आहे.

- गो. रा. खैरनार जीएसटी संपूर्ण देशात एकच असावा. मालाची वाहतूक करताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कर भरावे लागू नयेत, अशा घटकांसाठी राज्य जीएसटीचा विचार करत आहे. जीएसटी फायदेशीर आहे. मात्र, जोवर जकात कर काढला जात नाही, तोवर कोणताच उद्देश सफल होणार नाही. जकात बंद करणे आवश्यकही आहे. मुंबई महापालिकेचे उत्पन्न कितीही वाढले, तरी ते कमीच पडणारे आहे. कारण मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार आहे.मुंबई महापालिकेच्या कामात पारदर्शकता नाही, शिवाय जे कंत्राटदार आहेत, ते आपल्या कामात प्रामाणिक नाहीत. कारण त्यांना पालिकेतील खाचखळगे माहीत आहेत. इथली यंत्रणा जोवर सक्षम होत नाही, तोवर कोणतीही करप्रणाली लागू केली, तर तिचा ठसा उमटणार नाही.मुंबई महापालिका ही देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका आहे. मुंबई पालिकेचे मुख्य उत्पन्न जकातीवर अवलंबून आहे. सद्यस्थितीचा विचार केला, तर राज्यातील चार महापालिकांमध्ये जकात सुरू आहे. मात्र, जेव्हा जकात बंद करून दुसरी एखादी करप्रणाली लागू करायची झाल्यास, त्याचा तंतोतंत विचार होणे गरजेचे आहे. जोवर जकातीला सक्षम पर्याय सापडत नाही, तोवर कितीही आदळाआपट केली, तरी काहीच होणार नाही. कारण जकातीद्वारे पालिकेला उत्तम कर मिळत आहे. सेवा आणि वस्तू कर करप्रणाली लागू करायची झाल्यास, मुंबई पालिकेची यंत्रणा अत्यंत सक्षम करावी लागेल. जीएसटीमध्ये मुख्य समन्वय केंद्र आणि राज्य यांच्यात असले, तरी त्याचा मुंबई पालिकेवर प्रत्यक्ष नसला, तरी अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारवरील अवलंबित्व वाढणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात पालिकेच्या चाव्या राज्य सरकारकडे जाणार आहेत. मुंबई पालिकेमध्ये जकात बंद करून एलबीटी लागू करता येईल का? याबाबत या पूर्वी बराच विचारविनिमय झाला. मात्र, एलबीटीला व्यापारी वर्गाने प्रखर विरोध दर्शवला. कारण या करप्रणालीमध्ये पैसे भरण्यापेक्षा त्याचा ताळमेळ ठेवणे किंवा त्याचा हिशेब ठेवणे तापदायक ठरेल, असे कारण पुढे करण्यात आले. परिणामी, एलबीटीचा निभाव लागला नाही. तर जकात नाक्यांवर वाहनांना खूप वेळ ताटकळत थांबावे लागते. परिणामी, त्यांचा प्रवासाचा कालावधी वाढतो. अशा अनेक समस्या असतानाच, पालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून मालमत्ता कराचाही पर्याय पुढे आला होता. मुंबईत ज्या काही जुन्या इमारती आहेत, त्यांचे भाडे एकसारखे आहे. इमारतींचे भाडे वाढत नाही. त्यामुळे पालिकेला उत्पन्न मिळत नाही. जकात बंद करताना आपण जीएसटी, एलबीटी किंवा मालमत्ता कराकडे पाहिले, तरी उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ कसा घालायचा? हा प्रश्न निर्माण होतो.जकात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी जीएसटी लागू करताना खूप दक्षता घ्यावी लागेल. कारण कोणतीही करप्रणाली लागू करताना मूळ ढाचा विचारात घ्यावा लागतो. यंत्रणा किती सक्षम आहे? याचा प्रकर्षाने विचार करावा लागतो. मुंबई पालिकेचा विचार केला, तर भ्रष्टाचार खूप आहे. मुंबई पालिकेला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. जकात नाक्यावर बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. मुंबईला उत्पन्न मिळते, असे आपण वारंवार म्हणतो. मात्र, उत्पन्न मिळत असले, तरी उत्पन्न आणि खर्च याचा विचार होत नाही. उत्पन्न वाढले की, साहजिकच खर्चात वाढ होत असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मुंबईला मिळणारे उत्पन्न हे ‘टर्मिनेट’ होत असते. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.मुंबई महापालिकेची यंत्रणा सक्षम नाही, त्यामुळे जोवर यंत्रणा सक्षम होत नाही, तोवर कोणतीही करप्रणाली लागू केली, तर तिचा ठसा उमटणार नाही. जेव्हा इथली यंत्रणा सक्षम नाही, असे आपण म्हणतो, तेव्हा प्रामुख्याने भ्रष्टाचार आणि काळा पैसा याकडे लक्ष द्यावे लागेल. भ्रष्टाचाराचा पैसा वाचवला, तर फायदा होईल. पालिकेच्या अर्थसंकल्पाचा नीट विचार केला, तर ४० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च होणार नाही, परंतु तसा विचार कोणीच करत नाही. सरकारी यंत्रणा कुचकामी आहे. त्यामुळे जीएसटीचा मुंबई महापालिकेवर प्रत्यक्ष नाही, तर अप्रत्यक्ष परिणाम होईल. महत्त्वाचे म्हणजे, उत्पन्न वाढले की, आपल्या सर्वांवर भार येतो. तो भार केवळ खर्चाचा नसतो, तर तो अनेक अर्थांनी येतो. म्हणून उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ साधणारी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे.जीएसटी हा केवळ एकट्या मुंबई महापालिकेसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी आहे. परिणामी, सर्वांगीण विचार केला आणि मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती (इकॉनॉमी) सुधारली, तर जीएसटी मुंबई महापालिकेसाठी फायदेशीरच ठरेल, यात शंका नाही.

(लेखक मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त आहेत.)